नाशिक : शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याचा दावा करत जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतीगिरी महाराज यांनी एकच खळबळ उडवून दिली.
महायुतीत उमेदवारीवरुन घोळ असताना महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी अर्जात पक्षाच्या पुढे शिवसेना असा उल्लेख केल्यानं महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली.
आपल्याकडे पक्षाचा एबी फॉर्म नसल्याचं सांगितलं. प्रभू रामचंद्र सगळं काही व्यवस्थित करतील, असा आशावाद त्यांनी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला.
Related News
धनुष्यबाण चिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांचीही मागणी
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढ...
Continue reading
5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षच देऊन टाकणार का? देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात बिनतोड सवाल
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणीच्या अंति...
Continue reading
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘भाजपचाच राजकीय फायदा होईल’
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू ...
Continue reading
Shivsena Supreme Court Hearing : ‘आमच्याकडे अधिकार आहेत’, शिवसेना खटल्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाच्या आणि बहुचर्च...
Continue reading
शिवसेना कोणाची? आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी; ही दोन कलमं संपूर्ण गेम फिरवणार? असीम सरोदे यांनी सांगितलं गणित
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्...
Continue reading
Vinod Tawde : बिहारनंतर आता उत्तर प्रदेशात ‘खेला होबे’; विनोद तावडे यांच्यासमोर काय आव्हाने असणार? भाजप नेता काय जादू करणार?
बिहार : बिहार विधानसभा निवड...
Continue reading
“मला खात्री होती कोट मिळणार…”; भरत गोगावले यांनी बोलून दाखवली मनातली गोष्ट, रायगडच्या पालकमंत्रिपदावर मोठं भाष्य
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला असून शिवसेना शिंदे गटाचे...
Continue reading
तृणमूलचा भाजपला मोठा धक्का; ममता बॅनर्जींचं जोरदार कमबॅक, विधानसभा निवडणुकीनंतर दोनच महिन्यांत पुन्हा फिरलं वारं
पश्चिम बंगालच्या राजकारणात विधान...
Continue reading
Amit Thackeray : ‘मुलींचा हात धरल्यावर मारणारच’; ABVPला अमित ठाकरेंचा इशारा, कॉलेजच्या प्रश्नांवरही सरकारला घेरलं
Amit Thackeray : विलेपार्ल्या...
Continue reading
Shivsena Supreme Court Hearing : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा’, शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयात आज ठाकरे गटाचा अंतिम युक्तीवाद
Shivse...
Continue reading
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मोठी मागणी, युक्तिवादाने खळबळ
Shivsena Supreme Court Hearing...
Continue reading
Shivsena Supreme Court Hearing : राजकीय पक्ष, विधीमंडळ पक्षात फरक काय? सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे गटाची कोंडी होणार?
शिवसेना पक्ष ...
Continue reading
निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना ३ मेपर्यंत एबी फॉर्म सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उमेदवारी दाखल करत नाशिकमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या शांतीगिरी महाराजांच्या संपत्तीचा आकडा डोळे विस्फारुन टाकणारा आहे.
गेल्या १५ वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे. २००९ मध्ये महाराजांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती.
तेव्हा त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीचं मूल्य केवळ ७१ लाख ३९ हजार १५४ रुपये होतं.
आताच्या घडीला महाराजांची संपत्ती तब्बल ३९ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. म्हणजेच गेल्या १५ वर्षांमध्ये शांतीगिरी महाराजांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे.
वेरुळ गावात शांतीगिरी महाराजांचा मठ आहे. जनार्दन स्वामी यांचं निर्वाण झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शांतीगिरी महाराजांची नेमणूक करण्यात आली.
त्यांच्याकडे असलेल्या वाहनांचं मूल्य ६७ लाख ९१ हजार ४८६ रुपये इतकं आहे. त्यांच्यावर ७५ हजारांचं पीक कर्ज आहे.
शांतीगिरी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांवर आहे.
महाराजांची संपत्ती किती आणि कुठे?
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये २ एकर १ गुंठा जमीन- बाजारमूल्य ४,१३,४७,८०० रुपये
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १ एकर २६ गुंठे जमीन- बाजारमूल्य ३,४९,८६,६०० रुपये
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १० एकर ४ गुंठे जमीन- बाजारमूल्य २१,४१,६०,४०० रुपये
लाखलगाव (नाशिक) ६ एकर ३० गुंठे जमीन- बाजारमूल्य ८७,४८,००० रुपये
शिवडी निफाड ८ एकर ७ गुंठे जमीन- बाजारमूल्य ६८,७४,८०० रुपये