आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा

आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा

अकोला – अकोला शहरातील ३२० वर्षे जुने श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे मंगलमय वातावरणात महापूजा संपन्न झाली. मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्वसेवाधिकारी कृष्णा शर्मा आणि सौ. अर्चना शर्मा यांच्या हस्ते विधिवत अभिषेक व पूजन करण्यात आले.

या दिवशी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गेली ९२ वर्षे या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सातत्याने करण्यात येते. आषाढी एकादशीनिमित्त पंचक्रोशीतील हजारो भक्त विठ्ठल नामस्मरणासाठी येथे दाखल होतात.

विशेष म्हणजे, यंदाही भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून कीर्तन, भजन, प्रवचन तसेच महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसर भक्तिरसात न्हालेला असून, *’विठू माऊली’*च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे.

Related News

शहरातील आणि परिसरातील नागरिकांसाठी हे मंदिर नुसते श्रद्धास्थान नसून भक्तिभावाचे केंद्रबिंदू ठरते. परंपरा, भक्ती आणि सांस्कृतिक जाणीव यांचा संगम असलेला हा सोहळा दरवर्षी भक्तांच्या मनात अढळ स्थान निर्माण करतो.

— प्रतिनिधी, अकोला

Related News