अकोट
अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी गौणखनिज 32 लाख रुपये थकित दंड प्रकरणात अकोट तहसीलदार यांचे
कडून न्यायालयाच्या व वरिष्ठांच्या आदेशाला तहसीलसरांनी केराची टोपली दाखवली असून गैर अर्जदार यांचेकडून वसुली
Related News
किंवा मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यास पूर्णपणे चालढकल करून फक्त कागदोपत्री लेखी पत्र देऊन टाळाटाळ सुरू आहे.
उपविभागीय अधिकारी अकोट,अप्पर जिल्हाधिकारी अकोला,अप्पर आयुक्त अमरावती तिनही न्यायालयाचे आदेश व महसूलमंत्री मुंबई,
जिल्हा खणीकर्म अधिकारी अकोला,यांचे लेखी पत्र असून सुध्दा गैर अर्जदार एक ते सहा पैकी फक्त प्रकाश
श्रीराम होरे यांनी शासकीय खजिन्यात २,२९,९४४ रुपये दंड भरला असून बाकी मात्र पाच लोकांन कडून अद्यापही सक्तीची वसुली
किंवा मालमत्ता जप्त करण्याची कारवाई अकोट तहसीलदार यांनी केलेली नाही व प्रकरण पेंटिंग ठेवले आहे.
व ग्राम पंचायत बोर्डी यांचेकडे असलेल्या मालमत्ते बाबत चौकशी करून अहवाल सादर करावा यासाठी अकोट तहसीलदार यांनी अकोलखेड मंडळ
अधिकारी व बोर्डी तलाठी यांना लेखी पत्र दिले होते.
त्या पत्रावरून अकोलखेड मंडळ अधिकारी व बोर्डी तलाठी यांनी चौकशी करून ग्राम पंचायत बोर्डी यांचेकडे असलेल्या
मालमत्तेची माहिती अहवाल अकोट तहसीलदार यांचेकडे सादर केलेला आहे.
मात्र तरीही गेल्या एक महिना पासून आज पर्यंत ग्राम पंचायत बोर्डी यांचे मालमत्तेवर अद्यापही बोजा चढवण्याची कारवाई करण्यात आली नाही.
ही उल्लेखनीय बाब आहे.याबाबत अकोट तहसीलदार यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
करिता वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन ग्राम पंचायत बोर्डी गौणखनिज प्रकरणात थकित असलेल्या दंड वसुलीचे किंवा मालमत्ता जप्त करण्याचे आदेश द्यावे.
व वसुली करण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी विरुध्द कारवाई करावी.अशी मागणी अर्जदार यांनी केली आहे.
येता आठ दिवसांत वसुली किंवा मालमत्ता जप्त करण्याची कारवाई न झाल्यास वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती अर्जदार यांनी दिली.
प्रतिक्रिया
ग्राम पंचायत बोर्डी गौणखनिज 32 लाख रुपये थकित दंड वसुली प्रकरण वसुली व पुढील कारवाईसाठी तहसीलदार यांचेकडे लेखी पत्र दिले आहे.
मनोज लोणारकर
उपविभागीय अधिकारी अकोट.
प्रतिक्रिया
ग्राम पंचायत बोर्डी यांचेकडे असलेल्या मालमत्तेची चौकशी करून अकोट तहसीलदार यांचेकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.
पी.ए.होपळ.मंडळ अधिकारी अकोलखेड,राजाभाऊ खामकर तलाठी.
बॉक्स
ग्राम पंचायत बोर्डी गौणखनिज 32 लाख रुपये थकित दंड वसुली व मालमत्ता जप्ती प्रकरणात आठ दिवसात कारवाई न झाल्यास वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार.
बॉक्स
सदर प्रकरणा बाबत अकोट तहसीलदार यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/kundamdhun-garam-panyacha-jhara-amazing-event/