वाशिम, २९ :
वाशिम तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या अनसिंग येथील शृंगऋषी मंदिरात २९ जून
रोजी सकाळी एक अद्भुत आणि अनपेक्षित घटना घडली. मंदिरातील प्राचीन कुंडामधून
Related News
‘महाखनिज-2’ पोर्टलवरून राज्यभर 24 तास नजर; IAS रूबल अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारीअवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; डिजिटल ट्रॅकिंग, हायटेक क...
Continue reading
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
TET पेपरफुटीचा धक्कादायक खुलासा; 16वा आरोपी प्रकाश पवार अटकेत, सोलापूर कनेक्शन उघड
TET Exam Scam Solapur : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
अचानक गरम पाण्याच्या वाफा निघू लागल्याने संपूर्ण परिसरात आश्चर्याची लाट पसरली आहे.
पौराणिक महत्त्व असलेल्या या मंदिरातील कुंडात आजवर नेहमी थंड पाणीच आढळत होते.
मात्र आज सकाळी काही भाविकांनी कुंडाच्या मध्यभागी असलेल्या गोल खळग्यातून गरम पाण्याचा झरा
वाहताना पाहिल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाले. याप्रसंगी कुंडातील पाणी बादलीने भरून पाहण्यात आले असता ते प्रत्यक्षात गरम असल्याची खात्री झाली.
या घटनेमागे नेमकं काय कारण आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. काही नागरिकांनी याला दैवी चमत्कार मानत विशेष पूजा-अर्चा सुरू केल्या आहेत,
तर पर्यावरण अभ्यासक आणि काही जाणकार नागरिकांनी जमिनीखालच्या भूगर्भीय हालचाली,
उष्णजलस्तरात झालेला बदल किंवा हवामानातील परिणाम यावर संभाव्य कारणे म्हणून लक्ष वेधले आहे.
घटनेची माहिती मिळताच मंदिर परिसरात भाविकांची आणि स्थानिकांची मोठी गर्दी उसळली.
यामुळे परिसरात काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक प्रशासन, पुरातत्व विभाग आणि हवामान विभाग यांना तात्काळ माहिती देण्यात आली असून,
लवकरच भूवैज्ञानिक आणि जलतज्ज्ञांची विशेष टीम तपासणीसाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वैज्ञानिक तपासणीनंतरच यामागची कारणमीमांसा होणार स्पष्ट
या संपूर्ण घटनेबाबत शृंगऋषी संस्थानचे पुजारी सुशांत कौंडिण्य यांनी सांगितले की, “गेल्या कित्येक दशकांपासून कुंडातील पाणी थंड असते.
मात्र आज प्रथमच गरम पाणी बाहेर येताना आम्ही पाहिले. ही एक अनोखी आणि आध्यात्मिक अनुभूती आहे.”
दरम्यान, या गरम पाण्याच्या झऱ्याचे गूढ मात्र कायम असून, भाविकांमध्ये याबाबत उत्सुकता आणि श्रद्धेचे वातावरण आहे.
वैज्ञानिक तपासणीनंतरच यामागची कारणमीमांसा स्पष्ट होईल.
अशी माहिती आमचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय कपाले यांनी दिली.
Read Also : https://ajinkyabharat.com/pinjar-polisaccadoon-amali-mission-mission-udan-dinimit-diverse-vidyalaya-vidyartha-vidyartha-molache-guidance/