दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न

दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न

दानापुर (वा)..

तेल्हारा तालुक्यातील क्रमांक एकची असलेली ग्राम पंचायत दानापुर येथे दिनांक26/06/2025 रोजी राजर्षी

शाहु महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं.सरपंच

Related News

सौ.सपना धम्मपाल वाकोडे ह्या होत्या.यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्रा.पं.लिपिक अशोक राहाणे यांनी आजच्या दिनाचा उद्देश्य प्रतिपादन केले.

त्यानंतर आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन छत्रपती शाहु महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

या जयंती सोहळ्याचे सुत्रसंचलन अशोक रहाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश जामोदकर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पांडुरंग मानकर, गणेश खडसान,अविनाश जामोदकर,

यांनी परिश्रम घेतले,यावेळी अतुल राऊत,रामदास ढगे,घायल,

पत्रकार, व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Also :  https://ajinkyabharat.com/rashiyat-khasi-daunwar-gallele-shashi-tharoor-moskomadhye-russiachaya-parashtra-minister/

Related News