थरूर यांची “ऑपरेशन सिंदूर”, भारत-रशिया संबंधांवर चर्चा; काँग्रेसमध्ये वाद शिगेला
कॉंग्रेस नेते शशि थरूर सध्या रशियात खासगी दौऱ्यावर असून त्यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची भेट घेतली.
थरूर यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून, “जुन्या मित्रासोबत भेटून आनंद झाला” असे ते म्हणाले.
Related News
थरूर हे रशियाच्या सरकारी नेटवर्क RT च्या आमंत्रणावर गेले आहेत.
त्यांच्या ‘इनग्लोरियस एम्पायर’ या पुस्तकावर आधारित 10 भागांची डॉक्युमेंटरी सीरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे.
थरूर यांनी भेटीदरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’, गाझा संघर्ष, भारत-रशिया संबंध आणि दहशतवादाविरोधातील
भारताची भूमिका याबाबत वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
याआधी थरूर यांनी भारत सरकारच्या वतीने 33 देशांत सर्वदलीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व करत भारताची बाजू मांडली होती.
दरम्यान, थरूर यांच्या पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळणाऱ्या लेखामुळे कॉंग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
काँग्रेस अध्यक्ष खडगे यांनी अप्रत्यक्षपणे थरूर यांच्यावर टीका करत “पक्षासाठी देश महत्त्वाचा, काहींसाठी मोदी” असा टोला लगावला.
त्यावर थरूर यांनी “पंख तुमचे आहेत, उडण्यासाठी परवानगी मागू नका…” असे प्रत्युत्तर दिले.
Read Also : https://ajinkyabharat.com/dhamangaon-go-yehet-shanta-praveshotsavacha-jallosh/
