अकोल्यात मुसळधार पावसाचा कहर :

अकोल्यात मुसळधार पावसाचा कहर :

अकोला (प्रतिनिधी): काल झालेल्या जोरदार पावसामुळे डाबकी रोड परिसरात

वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसाच्या तीव्रतेमुळे रस्ते जलमय झाले असून,

सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरणाच्या कामालाही मोठा फटका बसला आहे.

Related News

पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली असून संपूर्ण रस्ते वितळल्याने खड्डे,

चिखल व पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी वाहनधारकांना

व स्थानिक नागरिकांना तासन्‌तास ताटकळत राहावे लागले.

या परिस्थितीमुळे स्थानिक रहिवाशांचा त्रास वाढला असून, आरोग्य धोक्यात येण्याची

शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी अनेक वेळा रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तक्रारी केल्या होत्या,

मात्र कालच्या पावसाने स्थिती आणखी बिकट केली आहे.

प्रशासनाने या समस्येकडे दखल घेत उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले आहे.

तरीदेखील नागरिकांना सतर्क राहण्याचे व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/kalpasoon-online-admission-process-start/

Related News