“हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात मराठी भाषेला स्थान दिलं,
शब्दकोष तयार केला तिथे भय्याजी जोशींच हे वक्तव्य म्हणजे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे.
अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी भय्याजी जोशी आणि आरएसएसच्या भूमिकेचा धिक्कार केला पाहिजे”
Related News
असं संजय राऊत म्हणाले.“महाराष्ट्रात कालपासून दोन विषय चर्चेत आहेत. अस्वस्थ करणारे आहेत.
पहिला विषय भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी हे काल मुंबईत आले.
त्यांनी जाहीर केलं की, मुंबईची भाषा मराठी नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे.
मराठी मीडियाने कसं दुर्लक्ष केलं याकडे? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का?
भाजपचे प्रमुख नेते मुंबईत येऊन सांगतात, मुंबईची भाषा मराठी नाही,
राज्याच्या मुख्यमंत्र्याने हे सहन करावं” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“भय्याजी जोशी अस म्हणतात की, मुंबईत येऊन कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो.
कारण मुंबईला कोणतीच भाषा नाही. त्यांचं म्हणण आहे की, घाटकोपरची भाषा गुजराती आहे.
ते तामिळनाडूत जाऊन चेन्नईत असं बोलू शकतात का?. बंगळुरु, लुधियानाला, पाटण्याला, लखनऊला जाऊन हे बोलू शकतात का?
महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन सांगतात मुंबईची भाषा मराठी नाही, ती गुजराती आहे अन्य आहे. मराठी येण्याची गरज नाही,
मराठी आमची राजभाषा आहे. राजभाषा असेल तर अशा प्रकारच वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे” असं संजय राऊत म्हणाले.
हे ऐकण्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं का?
‘हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य’
“भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. ठराव मजूर केला पाहिजे.
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे मिधें सत्तेत बसले आहेत, कुठे आहेत ते?
. माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी, भाषेसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं.
जे आज विचारवाहक बसले आहेत, त्यांनी हिम्मत असेल तर भय्याची जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करावा” असं संजय राऊत म्हणाले.
…नाही तर तुम्ही मराठी आईच दूध प्यालेले नाहीत
“भय्याजी जोशींसंदर्भात महाराष्ट्र विधानसभेत राज्य सरकारने निंदा ठराव आणून धिक्कार करावा,
नाही तर तुम्ही मराठी आईच दूध प्यालेले नाहीत. तुमच्या दूधात भेसळ आहे. तुमच्या जन्मात भेसळ आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सहन करणार नाही. कालपासून आमचं रक्त खवळलय” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yancha-rajinamyacha-developed-chief-minister/
