२५ दिवस बेपत्ता राहिलेल्या गुरुचरण सिंगचा पहिला फोटो आला समोर, पोलिसांबरोबर दिसतोय अभिनेता
गुरुचरण सिंग घरी परतल्यावरचा पहिला फोटो (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
Related News
मुंबई कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मरीन ड्राईव्हहून हाजीअलीच्या दिशेने जाणाऱ्या भरधा...
Continue reading
135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ED ची मोठी कारवाई; मुंबई-छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा ठिकाणी छापे
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 135 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात अं...
Continue reading
खवड्या डोंगरावर हात जोडून विनवणी, आग्रह अन्… चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचा नवा थरारक व्हिडिओ समोर!
Khavdya Dongar New Video : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या चांदगु...
Continue reading
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! टॉयलेटजवळ भाजी, काळे पडलेले पनीर; हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई
राज्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) मोठी मोहीम राबवण्यात ...
Continue reading
माज, दादागिरी तुमच्या राज्यात..; मराठी भाषेचा विरोध करणाऱ्यांवर भडकला मराठमोळा अभिनेता
Mumbai Auto Driver Dispute : महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहार...
Continue reading
मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद! 7 ते 9 ऑगस्ट 'वनरंग 2026'मध्ये 4 जमाती, 12 राज्यांचा सहभाग
वनरंग 2026 : महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतील नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण से...
Continue reading
अमित ठाकरे भाषणात भावूक; बोलता बोलता झाले ब्लँक, ‘मी विसरायला लागलो... परत येतो’, म्हणत स्टेज सोडलं; 10 मिनिटांनी पुनरागमन करून सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुंबईतील मनसे विद्यार्थी मे...
Continue reading
भिवंडीत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; बचावकार्य युद्धपातळीवर, 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
Bhiwandi Building Collapse : जीर्ण इमारतीचा भाग रात्री कोसळला; NDRF, पोलीस आणि ...
Continue reading
देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा; "मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार", दिल्लीतील चर्चांना पूर्णविराम
केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे स्...
Continue reading
ठाकरे बंधूंच्या जल्लोष सभेसाठी शिवसैनिक-मनसैनिकांचा मुंबईकडे लोंढा; लोकल ट्रेनमध्ये घोषणाबाजीने दणाणलं वातावरण
"धर्मेंद्र प्रधान राजीनामा झांकी है, नरेंद्र मोदी बा...
Continue reading
आषाढी एकादशी : ‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात दुमदुमला महाराष्ट्र, राज्यभर भक्तीचा महासागरआषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र भक्तिरसात न्हा...
Continue reading
झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत जय आणि शरूच्या नात्यात नवा टप्पा येणार आहे. पावसातील रोमँटिक अॅक्शन सीन, राज हंचनाळेची मेहनत आणि मालिकेतील 7 मोठे ट्विस्ट जाणून घ्या.
7 मोठे ट्विस...
Continue reading
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांपासून बेपत्ता होता.
तो अखेर स्वतःच घरी परतला आहे. २२ एप्रिलपासून गुरुचरण बेपत्ता होता
आणि दिल्ली पोलीस त्याचा राजधानीसह जवळच्या राज्यांमध्ये शोध घेत होते.
दिल्ली पोलिसांनी मुंबईत येऊनही त्याचा शोध घेतला होता.
आता २५ दिवसांनी परतलेल्या गुरुचरण सिंगला पहिला फोटो समोर आला आहे.
गुरुचरण सिंग शुक्रवारी (१७ मे रोजी) दिल्लीतील पालम भागात घरी आला.
गुरुचरण घरी आला, त्याबद्दल पोलिसांना कळवण्यात आलं. मग पोलिसांनी त्याची चौकशी केली.
चौकशीत तो नेमका कुठे गेला होता, याबाबत त्याने सांगितलं. घरदार सोडून गुरुचरण सिंग
धार्मिक प्रवासावर गेला होता, असं त्याने स्वतः चौकशीदरम्यान
पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं.
जवळपास २५ दिवसांत गुरुचरण सिंग अमृतसर आणि लुधियाना सारख्या अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये थांबला होता,
पण नंतर आपण घरी जायला पाहिजे याची त्याला जाणीव झाली आणि तो घरी परतला,
असं त्याने पोलिसांनी सांगितलं. आता घरी परतलेल्या गुरुचरणचा पोलिसांबरोबरचा
एक फोटो व्हायरल होत आहे.
यात ५० वर्षीय गुरुचरणचे केस पांढरे
धार्मिक यात्रा करायला गेलेला गुरुचरण सिंग सुखरुप घरी परतल्याने त्याच्या
कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. अभिनेता अविवाहित
असून त्याचे आई-वडील खूप वृद्ध आहेत. त्यामुळे गुरुचरण अचानक बेपत्ता झाल्याने त्यांना
धक्का बसला होता. पोलीसही त्याचा शोध घेत होते. त्यांनी गुरुचरणला
शोधण्यासाठी दिल्लीसह उत्तराखंड व हरियाणा तसेच मुंबईला
भेट दिली होती.
दरम्यान २२ एप्रिलला मुंबईला जात असल्याचं सांगून गुरुचरण सिंग घराबाहेर पडला
. पण तो दिल्ली विमानतळावर पोहोचलाच नाही. त्याने मुंबईला येत असल्याचं मित्रांना
सांगितलं होतं, मात्र तो विमानात बसलाच नाही हे कळाल्यावर त्यांनी शोधाशोध सुरू केली
. चार दिवस कुटुंबीय व मित्रांनी शोध घेऊनही तो सापडला नाही मग त्याच्या वडिलांनी पोलिसांत
तक्रार दिली. २६ एप्रिलला हरगीत सिंग यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे त्याचा शोध सुरू
करण्यात आला होता. पोलिसांना अभिनेत्याचा अपहरण झाल्याचा संशय होता. तसेच त्याने त्याच्या दोन
फोनपैकी एक घरात ठेवला तर दुसरा पालम भागात सापडला होता. त्याने त्याच्या बँक खात्यातून
१४ हजार रुपये काढले होते. त्याची बँक खाती तपासल्यावर त्याच्यावर कर्ज असल्याचं आढळलं होतं.
Read Also
https://ajinkyabharat.com/shikhar-since-i-was-15-16-years-old-know-what-janhvi-kapoor-said-about-her-boyfriend/