अकोला: अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील रसुलपूर येथील एका अल्पभूधारक युवा शे तकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. योगेश हरणे (वय ३५) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी शेतात विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
योगेश हरणे हे शेतकरी चळवळीत सक्रिय होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी अनेक आंदोलने केली होती. मात्र, शेतीतील नापिकी, वाढते कर्ज, आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी यामुळे ते सतत तणावाखाली होते. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते, त्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आणखी वाढली होती. दोन लहान मुलांचे शिक्षण, वृद्ध आई-वडिलांची देखभाल आणि शेतीवरील कर्ज यामुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते.
३ पट वाढलेले कर्ज ठरले आत्महत्येचे कारण
Related News
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
योगेश यांच्या शेतीवर सुरुवातीला ९० हजार रुपयांचे कर्ज होते. मात्र, व्याज वाढत गेल्याने हे कर्ज तब्बल २ लाख ७० हजारांपर्यंत पोहोचले. कर्ज फेडण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. विषप्राशन केल्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले, वृद्ध आई-वडील आणि दोन भाऊ आहेत.
शेतकरी चळवळीला मोठा धक्का
योगेश हरणे हे शेतकरी संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ता होते. त्यांनी प्रशासनावर वारंवार दबाव टाकून शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या निधनामुळे शेतकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
सरकारवर टीका
या घटनेनंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सरकार संवेदनशील असते, तर असे प्रकार थांबले असते,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबवण्यासाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात .