महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले
आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत
राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २०
Related News
मकरसंक्रांतीनिमित्त ‘पक्षी वाचवा’ विशेष सत्राचे आयोजन
- By Yash Pandit
ऑनलाइन फसवणुकीचा फेक “किसान अँप” प्रकरण अकोल्यात उजेडात
- By Yash Pandit
बाल विकास प्रकल्प शहरीतर्फे पालक मेळावा व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
- By Yash Pandit
धोकादायक वळणावर अपघात; दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
- By Yash Pandit
अस्वलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी; अकोल्यात उपचार सुरू
- By Yash Pandit
बुलढाण्यात लोक अचानक टक्कल का झाले? कारण उघड! तुम्हीही ही चूक करत नाही ना?
- By Yash Pandit
‘आशिकी २’ जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर! श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर रोमँटिक भूमिकेत
- By Yash Pandit
मोठी बातमी! ताज हॉटेलचं CCTV फुटेज अन् धनंजय मुंडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा बॉम्ब
- By Yash Pandit
आलेगाव ग्रामस्थांचा निषेध मोर्चा: विनयभंग प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा विरोध
- By Yash Pandit
मां ढांढण वाली दादीजींच्या २५व्या बसंतोत्सवानिमित्त दिव्यज्योत यात्रेचे अकोल्यात आगमन
- By Yash Pandit
मॉर्निंग वॉकवरून परतणाऱ्या महिलेचा निघृण खून: आरोपीला अटक
- By Yash Pandit
स. स. सार्वजनिक वाचनालय, रणपिसे नगर, अकोला येथे दि. 3/1/2025 रोजी “सावित्रीबाई फुले” यांची जयंती साजरी
- By Yash Pandit
नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार
आहे. त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा
निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा
निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांकडून
मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे
महाविकासआघाडीच्या जागावाटपाची शेवटच्या बैठकीला सुरुवात
झाली आहे. त्यामुळे आजच महाविकासआघाडीचा फॉर्म्युला
फिक्स होणार असल्याचे बोललं जात आहे. यंदाची विधानसभा
निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून
जागावाटपाचे सूत्र आखले जात आहे. त्यातच आता
महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आजच ठरणार
असल्याचे बोललं जात आहे. सध्या महाविकासआघाडीची मुंबईत
एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील सोफीटेल
हॉटेलमध्ये सुरु असलेल्या या बैठकीत जागावाटपावर
शिक्कामोर्तब केले जाणार आहे. महाविकासआघाडीतील
जागावाटपात विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून पेच आहेत.
महाविकास आघाडीत काँग्रेस ११९, शिवसेना ठाकरे गट ८६ आणि
शरद पवारांची राष्ट्रवादी ७५ जागा, शेकाप ३, समाजवादी पक्ष २
आणि माकप २ जागा अशापद्धतीने जागावाटप होणार आहे.
महाविकासाघाडीचे आतापर्यंत २२२ जागांवर एकमत झालं आहे.
त्यात मुंबईतल्या १३ जागा ठाकरे गटाला, ८ जागा काँग्रेस, १
समाजवादी पार्टीला देण्याबाबत सहमती झाली आहे. तर
मुंबईतल्या ४ जागांवर तिन्ही पक्षांकडून रस्सीखेच आहे. त्यात
संभाव्य जागांमध्ये उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता
आहे. भाजपाविरोधात एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे यावर
तिन्ही पक्षांचं एकमत आहे. अनेक मुस्लीम बहुल जागांवर काँग्रेस
आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/team-indias-lowest-run-score-in-the-country/