हा त्रास मी सहन करू शकत नाही – मनोज जरांगे

देवेंद्र

देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठयांना मदत करणे

सरकारने थांबवले आहे. फडणवीसांनी ही मदत रोखली आहे,

Related News

तातडीने ही मदत वाटप सुरू करावी अन्याथा राज्यात पुन्हा मोठे

आंदोलन उभे करीन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी

राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

सरकार गोरगरीब मराठ्यांना जाणून बुजून त्रास देत आहे.

त्यामुळे हा त्रास मी सहन करू शकत नाही. हा त्रास असाच सुरू राहिल्यास

राज्यात आणखी मोठे आंदोलन उभे करीन असा इशाराही यावेळी

जरांगे यांनी अंतरवालीत दिला. जुन्या कुणबी नोंदी सापडूनही अधिकारी

दखल घेत नाहीत. सरकारने या अधिकाऱ्यांना समज द्यावी.

तसेच गावा- गावातील मराठ्यांनी घरातील जुन्या दस्तवेजात देखील

जुन्या नोंदी शोधाव्या. ग्रामपंचायतीत देखील गावा-गावात नोंदी शोधाव्या असे,

आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले. यावर बोलताना त्यांच्याशी

बीड विधानसभा मतदार संघाबाबत चर्चा झाली नाही,

मात्र इच्छुक असणे हा दोष नाही इच्छुक कुणीही असू शकतो.

Read also: https://ajinkyabharat.com/it-is-beneficial-to-consume-rikamyapoti-tulshicha-leaves-in-the-morning/

Related News