नरहरी झिरवाळ प्रकरणावर राजकीय वाद पेटला; ‘भाजपचं षडयंत्र’ असल्याचा यशोमती ठाकूर यांचा दावा
नरहरी झिरवाळ प्रकरणावर राजकीय भूकंप; : मुंबईतील मंत्रालयात घडलेल्या लाचलुचपत प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी धाड टाकत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. या कारवाईनंतर विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी खळबळजनक दावा केला आहे. “हे प्रकरण म्हणजे मंत्री नरहरी झिरवाळ यांना बदनाम करण्यासाठी भाजपचं षडयंत्र असू शकतं,” असं म्हणत त्यांनी थेट भारतीय जनता पक्ष वर निशाणा साधला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, परवाना नूतनीकरणाच्या एका कामासाठी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि काही रक्कम स्वीकारताना संबंधित लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आलं. ही कारवाई मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीतच करण्यात आल्याने प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
Related News
टेन्शन वाढलं! गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, संशयही नाही; खलिस्तानी नेटवर्कची भरतीची नवी पद्धत
खवड्या डोंगरावर हात जोडून आईची विनवणी; कुणालला वाचवण्याचे अखेरपर्यंत प्रयत्न, थरारक व्हिडिओ समोर
IND vs SL: कोलंबो कसोटीपूर्वी श्रीलंकेचा मास्टरस्ट्रोक; 1996 वर्ल्ड कप विजेत्या दिग्गजाकडे मोठी जबाबदारी
डोंगरावर संपलं अख्खं कुटुंब; आई-मुलाचा जुना व्हिडीओ पाहून नागरिक हळहळले
‘मराठी आली पाहिजेच, पण…’; रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठीवर गिरीराज सिंहांचं मोठं वक्तव्य
गोविंदा-सुनीता वादावर अखेर भाची आरती सिंहचं मौन; म्हणाली, “लोकांना फक्त फुटेज हवंय…”
साखरेचे भाव 72 रुपयांवर; चहा, जिलेबी आणि मिठाईच्या दरात 10-12% वाढीची शक्यता
Rain Alert: महाराष्ट्र, दिल्ली, यूपीसह 20 राज्यांना पावसाचा तडाखा; IMDने दिला अलर्ट
खवड्या डोंगरावरून उडी मारणाऱ्या कुणालबाबत पोलिसांचा मोठा खुलासा; ‘आयफोन’ कारण नसल्याचे समोर
Operation Sindoor : पाकिस्तानला वाटलं राफेल पाडलं, पण भारतीय हवाई दलाने असा फिरवला गेम!
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठीच भाजपचा डाव? पुण्याच्या राड्यावरून प्रणिती शिंदेंचा घणाघात
गोविंदाच्या मुलाची बॉलिवूडमध्ये दणक्यात एन्ट्री! आई सुनीताही करणार स्क्रीन शेअर, ‘हीरो की हॉररइन’ कधी रिलीज?
“टक्केवारीचं सरकार” अशी टीका
या घटनेवर भाष्य करताना यशोमती ठाकूर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “आज मंत्रालयात कुठल्याही कार्यालयात गेलं तरी टक्केवारीचा हिशोब सुरू आहे. प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये टक्केवारी मागितली जाते. हे टक्केवारीचं सरकार आहे,” असा आरोप त्यांनी केला. याचबरोबर, “जर हे खरंच टक्केवारीचं सरकार असेल, तर नरहरी झिरवाळ यांना लक्ष्य करून त्यांना बदनाम करण्याचा डाव असू शकतो,” असा दावाही त्यांनी केला.
भाजप आणि मोदींवर हल्लाबोल
ठाकूर यांनी केवळ राज्य सरकारवरच नव्हे तर केंद्रातील भाजप नेतृत्वावरही टीका केली. “भाजपाने देशाला विकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात, पण साधी प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकत नाहीत. महिलांच्या आड लपण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. देशाची राजकीय वाटचाल चुकीच्या दिशेने चालली असल्याचंही त्या म्हणाल्या.
इतकंच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत असलेल्या ‘एपस्टीन फाईल’चा उल्लेख करत त्यांनी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “या फाईलमध्ये जर भाजपच्या मंत्र्याचं नाव येत असेल, तर त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही?” असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला.
कार्यालय सील; तपासाला वेग
दरम्यान, एसीबीने या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून नरहरी झिरवाळ यांचं कार्यालय सील केलं आहे. लाचेच्या व्यवहाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा सखोल तपास सुरू असल्याचं एसीबीकडून सांगण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या लिपिकाने चौकशीत काही धक्कादायक नावे घेतल्याची चर्चा असून, यामुळे मंत्र्यांचे खासगी सचिवही संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचं बोललं जात आहे.
राजकीय वातावरण तापलं
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून, सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. एकीकडे विरोधक सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून या प्रकरणात निष्पक्ष तपासाची भूमिका मांडली जात आहे. तपासातून नेमकं काय समोर येतं, आणि या आरोप-प्रत्यारोपांचा शेवट कुठे होतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
