विसापूर गडावर 3 बाय 3 फूटाचं प्राचीन भुयार पाहून संशोधकही चक्रावले;
विसापूर गडावर सापडलं 50 फूट लांब गूढ भुयार : महाराष्ट्राला लाभलेला गडकिल्ल्यांचा समृद्ध इतिहास आजही अनेक रहस्यांनी भरलेला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले अनेक किल्ले आजही इतिहासातील गूढ गोष्टी आपल्या कुशीत दडवून बसले आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध विसापूर गडावर एक धक्कादायक आणि रहस्यमय शोध लागला आहे. गडाच्या आडवाटेवर एक प्राचीन भुयार आढळून आलं असून यामुळे इतिहास अभ्यासक, दुर्गप्रेमी आणि संशोधकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मावळ परिसरात दुर्गसंवर्धन आणि गडभ्रमंतीसाठी काम करणाऱ्या “सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” या संस्थेच्या दुर्गसेवकांना हे भुयार आढळून आलं. विसापूर गडाच्या पायथ्याशी असलेल्या मालेवाडी गावातून गडाकडे जाणाऱ्या दुर्गप्रेमींना ही रचना दिसली. सुरुवातीला साधी कपार वाटणारी ही जागा आतमध्ये गेल्यावर एक मोठं आणि कोरीव भुयार असल्याचं स्पष्ट झालं.
हे भुयार अत्यंत अरुंद आणि अवघड ठिकाणी कोरलेलं आहे. विशेष म्हणजे या भुयाराच्या भिंतींवर खोदकामासाठी वापरण्यात आलेल्या छिन्नी आणि हातोड्यांच्या खुणा स्पष्टपणे दिसून येतात. त्यामुळे हे नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचं प्राथमिक निरीक्षणातून स्पष्ट होत आहे.
Related News
Chanakya Niti : या 3 प्रकारच्या लोकांपासून नेहमी दूर राहा; आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल!
Raksha Bandhan 2026 : भावाला राखी बांधताना तीन गाठीच का बांधतात? कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!
खवड्या डोंगरावर हात जोडून आईची विनवणी; कुणालला वाचवण्याचे अखेरपर्यंत प्रयत्न, थरारक व्हिडिओ समोर
डोंगरावर संपलं अख्खं कुटुंब; आई-मुलाचा जुना व्हिडीओ पाहून नागरिक हळहळले
‘मराठी आली पाहिजेच, पण…’; रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठीवर गिरीराज सिंहांचं मोठं वक्तव्य
गोविंदा-सुनीता वादावर अखेर भाची आरती सिंहचं मौन; म्हणाली, “लोकांना फक्त फुटेज हवंय…”
साखरेचे भाव 72 रुपयांवर; चहा, जिलेबी आणि मिठाईच्या दरात 10-12% वाढीची शक्यता
खवड्या डोंगरावरून उडी मारणाऱ्या कुणालबाबत पोलिसांचा मोठा खुलासा; ‘आयफोन’ कारण नसल्याचे समोर
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठीच भाजपचा डाव? पुण्याच्या राड्यावरून प्रणिती शिंदेंचा घणाघात
‘वारसाहक्काने मालमत्ता मिळते, पक्ष नाही’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना पुन्हा टोला
शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद? मोदींच्या कॅबिनेटमध्ये थेट एन्ट्रीची चर्चा!
खवड्या डोंगर बनला ‘सुसाईड पॉइंट’! कुणालच्या आधीही 13 जणांनी गमावला जीव; धक्कादायक माहिती समोर
दुर्गसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भुयाराची रुंदी आणि उंची साधारण 3 बाय 3 फूट आहे. सुरुवातीला हे भुयार सुमारे 50 फूट सरळ पुढे जातं. त्यानंतर काही ठिकाणी खाली खोल भाग असून पुढे डाव्या आणि उजव्या बाजूंना वेगवेगळे मार्ग जात असल्याचं दिसून आलं आहे. एका बाजूला 6 फूट, तर दुसऱ्या बाजूला 12 फूट लांबीचा भाग आहे. शेवटच्या टप्प्यात दोन्ही बाजूंना 10-10 फुटांचे विभाग आढळतात.
सध्या या भुयारात मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल साचलेला आहे. त्यामुळे संपूर्ण रचना अजून स्पष्टपणे पाहता आलेली नाही. मात्र, आतमध्ये असलेली रचना पाहून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
मावळातील विसापूर गडावर सापडलं गूढ भुयार, नेमकं कशासाठी खोदलं गेलं?
हे भुयार नेमकं कशासाठी तयार करण्यात आलं असेल? पाण्याच्या शोधासाठी की गुप्त मार्गासाठी? ध्यानधारणेसाठी एखादी जागा होती का? की युद्धकाळात शत्रूपासून बचाव करण्यासाठी वापरला जाणारा मार्ग होता? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गडकिल्ले हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून ते महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे जिवंत साक्षीदार मानले जातात. प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी आणि कातळामध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. अशातच विसापूर गडावर सापडलेल्या या प्राचीन भुयारामुळे इतिहास अभ्यासक आणि दुर्गप्रेमींमध्ये नव्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे हे भुयार अत्यंत अवघड ठिकाणी कोरलेलं असल्यामुळे त्याचा उपयोग नेमका कोणत्या कारणासाठी केला जात होता, याबाबत अनेक तर्क मांडले जात आहेत.
इतिहास अभ्यासकांच्या मते, सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांवर गुप्त बोगदे, पाण्याच्या टाक्या, लपवलेले मार्ग आणि भूमिगत रचना तयार करण्यात येत असत. युद्धकाळात शत्रूपासून बचाव, गुप्त हालचाली किंवा पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी अशा रचनांचा वापर होत असल्याचे अनेक पुरावे आजही आढळतात. त्यामुळे विसापूर गडावरील हे भुयार देखील त्याच ऐतिहासिक परंपरेचा भाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेषतः विसापूर आणि लोहगड हे किल्ले रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. पुणे आणि कोकण मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा वापर होत असे. त्यामुळे गुप्त मार्ग किंवा भुयार तयार करण्यामागे सुरक्षेचं कारण असू शकतं, असा अंदाज वर्तवला जात आहे. काही इतिहास संशोधकांच्या मते, हे भुयार पाण्याच्या शोधासाठी किंवा साधू-संतांच्या ध्यानधारणेसाठीही वापरलं गेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या या भुयाराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेक दुर्गप्रेमींनी हा शोध महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. काहींनी पुरातत्त्व विभागाने तातडीने या जागेची पाहणी करून अधिकृत संशोधन सुरू करावं, अशी मागणी केली आहे. कारण योग्य संशोधन झाल्यास या भुयारातून मराठा काळातील किंवा त्याही आधीच्या इतिहासाचे काही महत्त्वाचे पुरावे समोर येऊ शकतात.
विसापूर गड हा ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. विशेषतः पावसाळ्यात गडावरील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक येथे भेट देतात. मात्र आता सापडलेल्या या रहस्यमय प्राचीन भुयारामुळे विसापूर गड पुन्हा चर्चेत आला आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते, या भुयारावर सखोल संशोधन झाल्यास मराठा काळातील किंवा त्याही आधीच्या इतिहासाचे काही महत्त्वाचे पुरावे समोर येऊ शकतात. सह्याद्रीतील गडकिल्ल्यांमध्ये अजूनही अनेक गुप्त रहस्ये दडलेली असल्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा रंगू लागली आहे. त्यामुळे दुर्गप्रेमी आणि संशोधकांचे लक्ष आता विसापूर गडाकडे लागले आहे.
