पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;

पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;

पुणे: शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल

सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत कारवाई केली आहे.

प्राईड आयकॉन इमारतीत सुरू असलेल्या या कॉल सेंटरवर सुमारे

Related News

150 ते 200 पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.

यामध्ये 123 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात 111 पुरुष आणि 12 महिला यांचा समावेश आहे.

पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार,

या बनावट कॉल सेंटरमधून दररोज 1 लाख अमेरिकन नागरिकांचा वैयक्तिक डेटा

गोळा करून त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जात होतं. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दररोज

30 ते 40 हजार डॉलर्स इतकी फसवणूक केली जात होती.

जप्त सामग्री आणि मुख्य आरोपी:

या कारवाईदरम्यान 41 मोबाईल फोन, 61 लॅपटॉप आणि मोठ्या प्रमाणावर

डिजिटल डेटा पोलिसांनी जप्त केला आहे. प्राथमिक तपासात हे कॉल सेंटर चालवणारे

मुख्य आरोपी गुजरातमधील असल्याचे उघड झाले आहे.

यामधील अनेक कर्मचाऱ्यांचाही संबंध गुजरातशी असल्याचं समोर आलं आहे.

सायबर पोलिसांच्या मते, हे संपूर्ण प्रकरण मोठ्या प्रमाणावरील

आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचे संकेत देत आहे.

पुढील तपासात आणखी मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/center-aani-rajyani-team-indiarshakha-collected-work-collected-work/

Related News