बाळापूर (१२ जून) – निंबा अंदुरा सर्कल अंतर्गत गट ग्रामपंचायत मोखा जानोरीमेळ परिसरात
बुधवारी दुपारी अचानक आलेल्या वादळामुळे जानोरीमेळ गावात मोठे नुकसान झाले आहे.
अवघ्या २० मिनिटांच्या वादळात अनेकांच्या घरावरील पत्रे, अँगलसह उडून गेले,
Related News
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
Continue reading
दुबईहून परतलेल्या भारतीय तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुबईची स्वच्छता, शिस्त, ट्रॅफिक नियम, एमिराती कार्ड आणि भारताशी केलेल्या तुलनेमुळ...
Continue reading
मुकेश खन्नांचा मोठा यू-टर्न? समय रैनासोबत जाहिरातीनंतर 7 कारणांनी नेटकऱ्यांचा संताप उसळला
गेल्या काही महिन्यांपासून वादांच्या भोवऱ्यात असलेला स्...
Continue reading
स्वित्झर्लंडमधील लेक लुसर्न येथे सुरू असलेल्या अमेरिका-इराणमधील महत्त्वपूर्ण राजनैतिक चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी क...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत केलेल्या आत्मीय वा...
Continue reading
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
Continue reading
शेतमाल आणि घरातील जीवनावश्यक वस्तू पाण्यात वाहून गेल्या.
रमेश परघर मोर यांच्या धान्याच्या गोडाऊनवरील तीन पत्रे अँगलसह उडून गेली.
त्यांच्या गोदामातील १५ पोते ज्वारी, १२ पोते गहू, ६ पोते हरभरा व ८ पोते तुर पाण्यात खराब झाले.
प्रकाश परघर मोर व संजय परघर मोर यांच्या राहत्या घरावरचे संपूर्ण पत्रे अँगलसह उडून गेले.
त्यांच्या टीव्ही, फ्रिज, सोफासेट, पंखे, शालेय साहित्य, गॅस शेगडी, कपडे व किराणा माल यांसह संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला.
या घटनेची तत्काळ दखल घेत तहसीलदार बाळापुर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आकाश वानखडे,
ग्रामसेवक कैलास संस्कार, सरपंच पती श्री. हर्ष खरप, पंचायत सदस्य बबलू देशमुख,
तसेच शेतकरी संघटनेचे अनिल धुमाळे, रोजगार सेवक संघटनेचे
जीवन परघर मोर व सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
संकटग्रस्त कुटुंबांना तातडीने साखर, तांदूळ, डाळी, मसाले, चहा,
आटा यांचा किराणा साहित्याचा पुरवठा करण्यात आला.
जखमींना वैद्यकीय मदतीसाठी तात्काळ निंबा येथे दाखल करण्यात आले.
सरपंच पती श्री. हर्ष खरप व पंचायत सदस्य बबलू देशमुख यांनी सांगितले की, “शासनस्तरावरून या कुटुंबांना
लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार नितीन बापू देशमुख
यांच्या माध्यमातून सरकार दरबारी मदतीची मागणी लवकरच केली जाणार आहे.”
जानोरीमेळप्रमाणेच वझेगाव येथेही रवींद्र माळी व गणेश माळी यांच्या घराचे नुकसान झाले
असून स्थानिक प्रशासन आणि पंचायत समितीच्या प्रतिनिधींनी तिथेही भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले आहे.
प्रभावितांनी व्यक्त केलेली भावना:
“निसर्गाच्या रौद्र रूपापुढे माणूस हतबल ठरतो, आमचा काळ आला होता पण वेळ नव्हती…” – प्रकाश आणि संजय परघर मोर
Read Also : https://ajinkyabharat.com/kondolit-nanaji-deshmukh-krishi-sanjavani-projects-grand-inauguration-grand-planning-micro-planning-suruvat/