ऑपरेशन प्रहार अंतर्गत दहीहांडा हद्दीतील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई, ४०,६००/- रुपयांचा माल जप्त

ऑपरेशन प्रहार

अकोट: अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्री.अर्पित चांडक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात आली. दहिहांडा हद्दीतील विविध गावांमध्ये मिळालेल्या गोपनिय माहितीवरून छापे टाकण्यात आले.

कारवाईत आढळलेले तपशील:

  1. ग्राम कीनखेड पुर्णा बसस्टॉप – आरोपी: शंकर भाऊराव सपकाळ (वय ३९), ताब्यात १८० एमएल चे १११ देशी दारू बॉटल, किंमत: १०,०००/- रुपये

    Related News

  2. ग्राम कावसा – आरोपी: बंडु मारोती बगाडे (वय ४२), ताब्यात २७ लिटर हातमटटी दारू, किंमत: ६,९५०/- रुपये

  3. ग्राम पुंडा – आरोपी: सुवर्णा राजु राउत (वय ३३), ताब्यात ९० एमएल चे १०० देशी दारू बॉटल, किंमत: ४,५००/- रुपये

  4. ग्राम कीनखेड पुर्णा – आरोपी: दिपक दामोदर माळी (वय ५३), ताब्यात १० एमएल चे १०६ देशी दारू बॉटल, किंमत: ५,३००/- रुपये

  5. ग्राम कीनखेड पुर्णा – आरोपी: कुलदीप सतिष पेठे (वय २२), ताब्यात ९० एमएल चे १०५ देशी दारू बॉटल, किंमत: १०,२५०/- रुपये

एकूण जप्त मालाची किंमत ४०,६००/- रुपये इतकी आहे.

ही कारवाई अकोट उपविभागीय पोलीस अधिक्षक निखील पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले, पोलीस उपनिरीक्षक सोपान डाबेराव आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलिसांची प्रतिक्रिया:
नवनियुक्त ठाणेदारांच्या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दहीहांडा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू ठेवली जाईल आणि कोणत्याही अवैध धंदेवाईकांना गय मिळणार नाही, असे पोलिस निरीक्षक गोपाल ढोले यांनी सांगितले.

read also : https://ajinkyabharat.com/akot-police-action-akot-policeman-took-prompt-action-1-cow-thief-caught/

Related News