मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अकोला, अमरावती व वाशिम या तीन जिल्ह्यांतून या तिन्हींना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये गुन्हेगारांचे नाव असे आहे: नितेश ऊर्फ निलेश प्रभाकर थोप (वय ३८, रा. खरब ढोरे), आनंद निर्दोष घोसले (वय २८, रा. सिरसो गायरान) आणि कादरखान ऊर्फ कादर शेख गफार खान (वय ३०, रा. धोत्रा शिंदे).
या तिन्ही आरोपींविरुद्ध विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात गोवंश व जनावरांची चोरी, खून, गंभीर दुखापत, प्रतिष्ठित नागरिकांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून ब्लॅकमेल करणे, खंडणी मागणे, अंमली पदार्थ व घातक शस्त्रे बाळगणे, चैन स्नॅचिंग व सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे यांसारखे गुन्हे आहेत. वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांची वर्तणूक सुधारली नसल्यामुळे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ नुसार तडीपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी श्री संदिप अपार यांच्याकडे सादर केला गेला आणि कायदेशीर पडताळणीनंतर मंजुरी मिळाली.
ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस पथकात ठाणेदार श्रीधर गुट्टे, पोउपनि चंदन वानखडे, मपोउपनि मनिषा सामतकर, एएसआय दीपक कानडे, संजय खंडारे, मनीष मालठाणे, रितेश मद्दी आणि शंकर खेडकर यांचा सहभाग होता.
Related News
शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार ५ हजार रुपये; दुष्काळग्रस्तांना तातडीचा दिलासा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचा...
Continue reading
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
SIR विरोधातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकारासोबत गैरवर्तन झाल्याचा भाजपचा दावा; ऋचा पारा...
Continue reading
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : सरकारी कंपन्याही वाढवणार पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : Petrol आणि डिझेलच्या दरांक...
Continue reading
ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा; दिल्लीत INDIA आघाडीचा हल्लाबोल, निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा
INDIA Bloc Protest Against Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञाने...
Continue reading
शेतकऱ्यांना मदत लवकरच? ४४ टक्के पंचनामे पूर्ण; १०-१२ ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के पंचनाम्यांचे कृषिमंत्र्यांचे लक्ष्य
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्...
Continue reading
SIR वरून विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचे सणसणीत उत्तर; अचूक मतदार यादीसाठी महत्त्वाचे 8 मुद्दे समोर
Devendra Fadnavis on SIR : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR 2026...
Continue reading
फडणवीस मोदींचे वारसदार? उपपंतप्रधानपदाबाबत संघात चर्चा असल्याचा संजय राऊतांचा दावा; तीन महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
१० ते १२ महिलांच्या तक्रारींचा दावा; श्वेता महालेंचा सूचक इशारा, संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता अधि...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
No UPI Day Today 2 October : आज बाजारात जाताना खिशात कॅश ठेवा; व्यापाऱ्यांचा ‘नो UPI डे’, अतिरिक्त शुल्काच्या प्रस्तावाला विरोध
No UPI Day Today 2 October : देशभरातील व्यापारी सं...
Continue reading
पोलिसांच्या कडक पावलामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
read also: https://ajinkyabharat.com/salil-ankolas-story-of-cricket-debut-retirement-at-the-age-of-28/