प्रतिनिधी : देवानंद खिरकर
अकोट : अकोट तालुक्यातील डांगरखेड गावात आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या शंकर पट उत्सवाचा पारंपरिक पद्धतीने जल्लोषात उत्साह साजरा करण्यात आला. जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी आयोजित या भव्य शंकर पट कार्यक्रमाला कडाक्याच्या थंडीचा अडथळा ठरला नाही. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्सवाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव अॅड. महेश गणगणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी शंकर पट उत्सवाचा मनमुराद आनंद घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. “आदिवासी समाजाच्या परंपरा, लोककला आणि संस्कृती जपणारे असे उत्सव ग्रामीण जीवनाचा आत्मा आहेत. अशा उपक्रमांमुळे सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच जय हनुमान क्रीडा मंडळाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाला गावचे पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा निनाद, नृत्य व जल्लोषामुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता.
Related News
अकोल्यात पाल्म संडे हर्षोेेल्हासात, भक्तिभावाने साजरा
अकोला: ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र परंपरेतला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे पाल...
Continue reading
अहिल्यानगरच्या संगमनेर येथील पंचायत समिती कार्यालयात जोरदार राडा झाला आहे. तालुका अभियान व्यवस्थापक नंदलाल पोपटराव कोकाटे यांना कार्यालयात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. स्थानिक सू...
Continue reading
अकोट तालुक्यातील टाकळी बु परिसरात रेती तस्करीची घटना गंभीर बनली आहे. मागील महिनाभरात नदी पात्रातील घाटावर रेती तस्करांनी महसूल प्रशासनाच्या नाकावर ...
Continue reading
बार्शी टाकळी तालुक्यातील राजनखेड येथील आदर्श ग्रामपंचायत अधिकारी मनोज देविदास गवई यांचा पंचायत समिती बार्शी टाकळी येथील वसंतराव नाईक सभागृहात ...
Continue reading
पश्चिम बंगालच्या सरकारच्या निर्णयावर राष्ट्रपती व पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली नाराजी
पश्चिम बंगालमध्ये आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेच्या आयोजनासंद...
Continue reading
अकोला जिल्ह्याच्या अडगांव बु. येथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव ६ मार्च रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. हा उत्सव गावभर शिवमय वातावरण निर्माण करणा...
Continue reading
पातूर तालुक्यातील मळसूर परिसरात सुरू असलेल्या पालखरी शेतरस्त्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला असून, स्थानिक शेतकऱ्यांनी या कामात गंभीर अनियम...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
प्रभाकर मोरे म्हणाले: “शिमगा – देव आपल्या घरी येतो आणि तो अनुभव घ्यायला प्रत्येकाने वेळ द्यावा”
कोकणातील होळी किंवा शिमगा हा सण फक्त रंगांच्या आणि उत्सा...
Continue reading
पातूर तालुक्यातील खेट्री ग्रामपंचायतीत गेल्या तीन वर्षांत तब्बल सात सचिव बदलल्याने प्रशासनाचा कारभार अक्षरशः ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वार...
Continue reading
कडाक्याच्या थंडीतही शिस्तबद्ध व यशस्वी आयोजन केल्याबद्दल जय हनुमान क्रीडा मंडळाचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे गावातील एकोपा वाढत असून तरुण पिढीला आपल्या परंपरेची ओळख मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
read also : https://ajinkyabharat.com/dahihanda-police-raid-42-thousand-rupees-of-banned-gutkha-seized/