अकोट तालुक्यातील टाकळी बु परिसरात रेती तस्करीची घटना गंभीर बनली आहे. मागील महिनाभरात नदी पात्रातील घाटावर रेती तस्करांनी महसूल प्रशासनाच्या नाकावर निंबू टाकून, मोठ्या प्रमाणात अवैध रस्त्यांचा वापर करून रात्रीच्या सुमारास शेकडो ब्रास रेती उपसून शासनाचा महसूल बुडविला आहे. स्थानिक महसूल प्रशासनाने फक्त रस्त्यावर खड्डे खोदून पर्यावरणाचे रक्षण केल्याचा दिखावा केला; मात्र नागरिकांच्या मते ही कारवाई अपुर्या ठरली आहे.
स्थानिक नागरिकांच्या भावना पाहता, प्रशासनाकडून सर्जिकल स्ट्राईक (धडक कारवाई) करण्याची गरज आहे. जेव्हा तस्कर जेसीबी आणि इतर यंत्रसाधनांच्या साहाय्याने मोठे रस्ते बनवून शेकडो ब्रास रेती चोरी करतात, तेव्हा रात्री खड्डे बुजवून आणखी रेती उपसा केली जाते. यामुळे ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजामुळे आजूबाजूच्या गावकऱ्यांची झोप बाधित होत आहे.
टाकळी बु परिसरातील नदी घाटावर यावर्षी अद्याप अधिकृत लिलाव झाला नसतानाही अवैध रेती उपसा होत असल्याने महसूल प्रशासनावर संगणमताचे आरोप होत आहेत. नदीपात्राची खोली अनियंत्रित वाढल्याने जलस्त्रोत धोक्यात आले आहेत, आणि ओव्हरलोड वाहनांमुळे ग्रामीण रस्ते उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल माफियांच्या खिशात जात आहे.
Related News
अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावूक; भरसभेत डोळ्यात अश्रू, म्हणाल्या- ‘३२ वर्षे ५ महिन्यांचं अतूट नातं’
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०९व्या वार्षिक सर्वसाधा...
Continue reading
UPI शुल्कावर राज ठाकरे आक्रमक; “डिजिटल सापळा” म्हणत केंद्र सरकारवर निशाणा
UPI व्यवहारांवरील शुल्काच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच...
Continue reading
VIDEO : ट्रेनमध्ये तिकीट तपासणीवरून वाद; महिलेने स्वतःचे कपडे फाडल्याचा VIDEO व्हायरल
टीसीने तिकीट मागितल्यानंतर महिलेसोबत शाब्दिक बाचाबाची; विनयभंगाचा आरोप, रेल्वे सेवेकडून पुराव...
Continue reading
लोकप्रतिनिधींचा काजू-बादामावर ताव; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, प्रशासनाला सुनावले
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू असताना काजू-बादाम खातानाचा व्हिडीओ ...
Continue reading
8 महिन्यांची चिमुकली मध्यरात्री अंथरुणातून बेपत्ता; नाशिकमध्ये खळबळ, अपहरणाचा गुन्हा दाखल
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटन...
Continue reading
पेट्रोल पंपांवर UPI पेमेंटला नकार? 2 हजारांवरील व्यवहाराबाबत चर्चेला उधाण; ग्राहकांमध्ये संभ्रम
UPI Charge Impact : डिजिटल पेमेंटचा वापर देश...
Continue reading
सुमारे 1.25 लाख पॅरासिटामोल टॅबलेट माघारी; FDA च्या गुणवत्ता चाचणीत फेल, दोन सरकारी रुग्णालयांमध्ये खळबळ
FDA : वापरल्या जाणाऱ्या टेल्मिसार्टन 40 मिलीग्रॅम...
Continue reading
एपस्टीन फाइल्स घडू नयेत म्हणून अमेरिकेला मोदी सरकारकडून खंडणी? संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यां...
Continue reading
Budhaditya Rajyog 2026 : पुढील 10 दिवस महत्त्वाचे; या 6 राशींना करिअर, पैसा आणि व्यवसायात लाभाची शक्यता
Budhaditya Rajyog 2026 : ज्योति...
Continue reading
UPI शुल्काच्या विरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार; QR कोड हटवण्यास सुरुवात, सरकारला आंदोलनाचा इशारा
UPI MDR Charges : डिजिटल व्यवहारांसाठी मोठ्या प्...
Continue reading
सोन्याचे दर कडाडले, चांदीही महागली; सणासुदीत ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका
गणपतीनंतर दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंच्या दरात मोठी वाढ; सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्रा...
Continue reading
स्थानीय प्रशासनाने महसूल, पोलीस आणि आरटीओ यांचे संयुक्त पथक तयार करून रात्रीची गस्त वाढवणे आवश्यक आहे. फक्त दंड न आकारता, तस्करी करणाऱ्या वाहनांवर कायमस्वरूपी जप्तीसारखी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच, नदीपात्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. फक्त ट्रक चालकांवर कारवाई न करता, मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना याकडे विशेष लक्ष देऊन भरारी पथके तैनात करावी लागेल. स्थानिक महसूल कर्मचारी गस्तवर असतानाही तस्करांना अधिकारी घाटावर पोहचण्यापूर्वी माहिती मिळते, त्यामुळे ते पसार होतात. यामुळे गुप्त आणि वेगवान सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई करणे गरजेचे ठरते, ज्यामुळे रेती माफियांना वेसन घालता येईल.
read also : https://ajinkyabharat.com/shocking-suicide-of-a-student-of-trimbakeshwar-pimpri-area-mourning-in-the-area/