पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारले हा माझ्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आणि स्वतःसाठी दुःखद निर्णय आहे, अशा भावना पालघरचे विद्यमान खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील राजेंद्र गावित यांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करुन महायुतीच्या उमेदवाराला विजयी करणार, असा विश्वासही गावितांनी बोलून दाखवला. शिवसेनेकडे असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपने हिसकावून घेत हेमंत विष्णू सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
राजेंद्र गावित काय म्हणाले?
पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारले हा माझ्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आणि स्वतःसाठी दुःखद निर्णय आहे. हे खरे असले तरी माझ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचा मला फोन येत असून वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.
माझे जरी तिकीट नाकारले गेले असले तरीसुद्धा महायुतीचे जे उमेदवार आहेत. त्या उमेदवाराबाबत कार्यकर्त्यांमध्ये असलेले नैराश्य आणि नाराजी दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपण प्रयत्न करूया असे आवाहन पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
Related News
Shambhuraj Desai : ज्या पद्धतीने मागच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे त्यांनाच गृहमंत्रीपद होतं,
तोच फॉर्म्युला आता लागू असायला हवा. असा सल्ला शिवसेनेचे आमदार शंभूराज...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं...
अकोला जिल्ह्यात अंदाजे 64.45 टक्के मतदान झालंय...
प्राथमिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदानाची सरासरी
64.45 टक्...
Continue reading
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला.
कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला...
Continue reading
Sushant Singh Rajput Unfulfilled Desire: प्रतिक बब्बरनं अलीकडेच एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल सांगितलं. प्रतिकनं सांगितलं की, 'छिछोरे'च्या शुटिंगनंतर सुशांतला...
Continue reading
मणेरा यांचे विकासाच्या मुद्याकडे लक्ष केंद्रीत; विद्यमान आमदारांना रोखण्याचे ठाकरे गटापुढे मोठं आव्हान आहे.
भाईंदर/विजय काते : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार...
Continue reading
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला आग लागली आहे.
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये ही आग लागली आहे.
सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...
Continue reading
अकोट शहरातील मध्यवर्ती भागात असलेले अकोट आगार हे समस्यांचे माहेरघर बनले आहे
या ठिकाणी विविध समस्या असून या समस्यांकडे अकोट आगारप्रमुख यांनी हेतू पुरस्कर दुर्लक्ष
केल्याचे समज...
Continue reading
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने
Continue reading
शहा व यादव यांच्यावर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्याची जबाबदारी
नवी दिल्ली : हरियाणातील भाजपच्या विजयी हॅट्ट्रीकनंतर स्थापन होणाऱ्या नव्या सरकारसाठी केंद्रीय निरीक्षक म...
Continue reading
पातूर : राज्यात विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा विषय सध्या सगळीकडे चर्चिला जात आहे. गत काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघातील जवळजव...
Continue reading
साठ वर्षीय महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटा फरार
अकोला : शहरातील जठारपेठ भागात एका 60 वर्षीय महिलेची 15 ग्राम सोनसाखळी अज्ञात मोटर सायकल स्वाराने लंपास केल्याची घटना आज सकाळी घ...
Continue reading
माजी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव हेमंत सावरा यांना पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देत असल्याचे भाजपने गुरुवारी रात्री जाहीर केले. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या एक दिवस, किंबहुना जेमतेम काही तास आधी भाजपने तिकीट जाहीर केले. त्यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना मोठा धक्का मानला जात आहे. गावितांना दुःख झाले असले, तरी कुठलाही निर्णय घेण्यासाठी पक्षाने त्यांच्याकडे अवधीच दिला नाही.
विशेष म्हणजे राजेंद्र गावित हे पूर्वी भाजपवासी होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीत लढले. मात्र पालघरची जागा शिवसेनेला सुटल्याने गावितांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढली, ते विजयीही झाले. राजकीय दृष्ट्या ही एक प्रकारची अॅडजस्टमेंट मानली जात होती.
यंदा हा मतदारसंघ परत मिळवण्यासाठी भाजप आग्रही होतं. परंतु गावितांना पुन्हा संधी मिळणं फिक्स मानलं जात असल्यामुळे त्यांची घरवापसी होऊन ते भाजपच्या तिकिटावर आता रिंगणात उतरतील, अशी अटकळ बांधली जात असतानाच महायुतीत भाकरी फिरवण्यात आली.