मूर्तिजापूर पब्लिक स्कूलचे तीन विध्यार्थांची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड

मूर्तिजापूर

मुर्तिजापूर – नुकत्याच 10 नोव्हेंबर 2025 रोजी अकोला येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत मूर्तिजापूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा गौरव वाढविला आहे.

या स्पर्धेत शाळेतील एकूण ९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी १४ वर्ष वयोगटातून अर्जुन प्रवीण पडोळे आणि प्रियांश आशिष साखरे, तर १७ वर्ष वयोगटातून नैतिक नितीन सवाई या तीन खेळाडूंची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शाळेचे अध्यक्ष  कमलाकर गावंडे, माजी नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका  पल्लवी मुळे यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related News

विद्यार्थ्यांनी आपले यश शाळेतील सर्व शिक्षिका आणि प्रशिक्षकांना दिलेले श्रेय मान्य केले असून, हे विद्यार्थी कराटे अँड स्पोर्ट्स असोसिएशन, मूर्तिजापूर येथे नियमित प्रशिक्षण घेत आहेत.

या यशामुळे शाळा तसेच मूर्तिजापूर शहराचा अभिमान वाढला असून, विभागीय स्पर्धेतही हे विद्यार्थी उत्तम कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

read also : https://ajinkyabharat.com/akot-prahar-sangathans-kapus-indicates-movement-demanding-immediate-purchase/

Related News