प्रतिनिधी, अकोला
सध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
अकोला जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून,
याचा परिणाम फक्त माणसांवरच नव्हे तर प्राण्यांवरही होत आहे.
Related News
CJP Protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज प्रकरणी दिल्ली पोलिसांना हाय कोर्टाची नोटीस; CCTV फुटेज जतन करण्याचे आदेश
कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्...
Continue reading
Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे; त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
...
Continue reading
Manoj Jarange Patil : ‘जंतर-मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार’; मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
Manoj Jarange Patil ...
Continue reading
Delhi Metro : मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद; पुढील आदेशापर्यंत प्रवेश-एक्झिटला ब्रेक, सुरक्षा व्यवस्था कडक
Delhi Metro News : रा...
Continue reading
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका; थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस, दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश
Shiv Sena MP News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकी...
Continue reading
Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP आंदोलनावर कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय
NEET पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चेला उधाण ...
Continue reading
जंतर-मंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप; दिल्ली पोलिसांनी फेटाळले दावे, राजकीय वातावरण तापले
राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर पर...
Continue reading
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच जाहीर होणार; ‘या’ वेळी मिळणार मोठी अपडेट
राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे...
Continue reading
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विद्यार्थी आंदोलन आणि पेपरफुटीवर झाली चर्चा?
दिल्लीतील राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड पाहायला मिळाली. राष्ट्रव...
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला जात नाही? मोदी सरकारसमोरची ‘ही’ 5 प्रमुख कारणे; जाणून घ्या सविस्तर
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री
Continue reading
विशेषतः पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोंबड्यांच्या आरोग्यावर उष्णतेचा विपरीत परिणाम
उष्णतेमुळे कोंबड्यांचे अन्न सेवन कमी होते, परिणामी त्यांचे वजन घटते आणि अंडी उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.
काही वेळा तापमान अत्यंत वाढल्यास कोंबड्यांचा मृत्यूही होतो. या गंभीर परिस्थितीत
अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शेतकरी सैय्यद रियाज यांनी
आपल्या पोल्ट्री फार्मवर अनोखी शक्कल लढवून कोंबड्यांचे प्राण वाचवले आहेत.
८ हजार कोंबड्यांचा संरक्षणासाठी खास उपाययोजना
सैय्यद रियाज यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये ८ हजार कोंबड्यांचे संगोपन केले जाते.
उन्हापासून या पक्षांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी फार्ममध्ये वॉटर स्प्रिंकलर, ६ एअर कुलर,
आणि बाहेरील गरम हवा आत शिरू नये यासाठी हिरव्या जाळ्या (नेट्स) बसवलेल्या आहेत.
गरम हवेला ‘नो एंट्री’!
फार्मभोवती नेट लावल्यामुळे बाहेरील उष्ण वाऱ्याचा अडथळा निर्माण होतो,
आणि आतील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
यामुळे कोंबड्यांना आवश्यक तेवढे थंड वातावरण मिळून उत्पादन व आरोग्य दोन्ही सुरळीत राहतात.
Read Also : https://ajinkyabharat.com/makadachanya-talkyamadhyaye-fierce-justification-rastyavarch-december-gangwar/