शिंदे-फडणवीसांविरुद्ध बच्चू कडू भिडणार
पुण्यात काल परिवर्तन महाशक्तीची महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी
Related News
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
उपस्थित होते. या बैठकीत १५० जागांबाबतचा निर्णय घेण्यात
आला आहे. लवकरच इतर जागांवरचा निर्णयदेखील घेण्यात येणार
आहे. बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे असो
की देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातदेखील उमेदवार देणार
असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मनोज जरांगे
पाटील यांच्याशीदेखील आमचं बोलणं सुरु आहे. ते आमच्या
सोबत येतील, असे प्रयत्न सुरू असल्याची माहिती परिवर्तन
महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. तसेच महादेव जानकर देखील
आमच्यासोबत येतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.
सामान्य माणसाला आपलं वाटेल असं सरकार आम्ही स्थापन
करण्याचा प्रयत्न करु असे बच्चू कडू म्हणाले. आम्ही चांगले
उमेदवार देणार असल्याचे कडू म्हणाले. पवारसाहेब म्हणतात
परिवर्तन आणू, तुम्ही कसलं परिवर्तन आणणार आहात? असा
सवालही कडू यांनी केला. तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता
कसं काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवालही कडू यांनी
उपस्थित केला. परिवर्तनाचा अधिकारी युतीलाही नाही आणि
आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार
आम्हाला असल्याचे कडू म्हणाले. नवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थानं
कामाचं असेल, बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा
असल्याचे कडू म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-will-reveal-its-first-list-of-tickets-for-sitting-mlas-today/