अकोला: शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या कॅन्टीनवर चहा घेत असताना किरकोळ वादातून एका तरुणावर गंभीर दगडहल्ल्याची घटना घडली आहे. अकापेट पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा नोंद झाला असून पोलीस तपास करत आहेत.
फिर्यादी रोशन रविंद्र थोरात (23), रा. बाळापूर रोड, अकोला, हा संबंधित रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कार्यरत आहे. २ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता तो नर्स पूजा चव्हाण सोबत अकोट रोडवरील काटकर यांच्या कॅन्टीनवर चहा घेण्यासाठी गेला होता. यावेळी कॅन्टीनमध्ये डॉ. सायन राम बुटे, डॉ. सुनिल खराटे, डॉ. सालगर सर व इतर कर्मचारी उपस्थित होते.घटनेनुसार, रोशन थोरात यांनी नर्स पूजा चव्हाण संदर्भात काही प्रश्न डॉ. भुषण माहोकार यांना विचारले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. संतापलेल्या डॉ. माहोकार यांनी हातातील दगड रोशनच्या डोक्यावर मारल्याने तो गंभीर जखमी झाला व त्याला रक्तस्राव झाला. उपस्थित डॉक्टरांनी दोघांमधील वाद थांबवला.
या गंभीर घटनेनंतर जखमी रोशन थोरात यांनी आरोप केला की, हॉस्पिटल व्यवस्थापनाने आरोपी डॉक्टरची बाजू घेतली असून त्यांच्या मदतीसाठी काहीही केले नाही. डॉक्टर राधिका केळकर यांनीही घटनाची दखल न घेता आरोपी डॉक्टरच्या बचावासाठी प्रयत्न केले असल्याचे रोशनने सांगितले.अकापेट पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक रहिवासी व रुग्णालयातील कर्मचारी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. पोलीस प्रशासनाच्या कारवाईची सर्वांना उत्सुकता आहे.
Related News
read also : https://ajinkyabharat.com/pune-metro-metro-route-fixed-till-airport-big-relief-from-pune-karana-traffic/
