मुर्तीजापूर : शहरात मुलं पळवणाऱ्या टोळीबाबतच्या अफवांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना अण्णाभाऊ साठे नगर परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ साठे नगर भागात एक अज्ञात महिला संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. ती परिसरातील लहान मुलांशी बोलण्याचा आणि त्यांना आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा नागरिकांना संशय आला. काही सतर्क नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप करत महिलेला अडवले आणि तिच्याकडे चौकशी केली. मात्र तिच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी तिला पकडून तातडीने पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरातही अशाच प्रकारची संशयास्पद घटना समोर आली होती. त्यामुळे शहरात मुलं पळवणाऱ्या टोळीबाबत भीती आणि चर्चांना उधाण आले आहे. पालकांमध्ये विशेषतः चिंता वाढली असून, “मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Related News
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
Continue reading
लोकप्रतिनिधींचा काजू-बादामावर ताव; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, प्रशासनाला सुनावले
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू असताना काजू-बादाम खातानाचा व्हिडीओ ...
Continue reading
DJ मुळे मंत्र्यालाच ऐकू येणे कमी; गुलाबराव पाटलांचा धक्कादायक अनुभव, गणेशोत्सवात डीजे न वाजवण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डीजेच्या मोठ्या आवाजाचा मुद्दा पुन्...
Continue reading
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर...” Manoj Jarange Patil चा निर्वाणीचा इशारा; अंतरवालीत वातावरण तापलं
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला असून, मराठा ...
Continue reading
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी आणि फोटोग्राफरचे विमान झ्युरिकला डायव्हर्ट; तांत्रिक बिघाडामुळे सहा अधिकारी अडकले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवसीय लं...
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा महासंकट! पुरानंतर काठमांडू हादरले; ५.० तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती
Nepal : आधी विध्वंसक पूर आणि भूस्खलनाच्या संकटातून सावरणाऱ्या नेपाळला आता भूकंपाचा...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
मुंबई : राज्यभरात आ...
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
राज्यात मतदार यादीचा मुद्दा पेटला; बीडमधील 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
राज्यात मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य ...
Continue reading
अक्कलदाढ पडल्यावर ती पुन्हा उगवत नाही, आता म्हातारपणात...; मनोज जरांगेंचा भुजबळांवर घणाघाती हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक Manoj Jarange Patil यांनी पुन्हा ...
Continue reading
महाराष्ट्र पुन्हा हादरला! खासगी शाळेच्या बस चालकाकडून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
नवी मुंबईतील धक्कादायक घटना; आरोपी बस चालकाला अटक, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
नवी मुंबई आणि पन...
Continue reading
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. संबंधित महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, तिच्या हालचालींचा आणि पार्श्वभूमीचा तपास केला जात आहे. अफवांमुळे निर्माण होणारी भीती टाळण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या संदेशांमुळे गैरसमज पसरू शकतात. तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास स्वतः कारवाई न करता पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
सध्या परिसरात पोलिस गस्त वाढवण्यात आली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/indication-of-action-against-employees-coming-to-ushira-in-akot-municipal-council/