[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरविरोधात (Prashant Koratkar) लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. तसंच ब्युरो ऑफ इमिंग्रेशनकडून कोरटकरने कुठे कुठे प्रवास केला याची देखील माहिती घेतली जात आहे. प्रशांत कोरटकर फरार असून तो देश सोडून दुबईला गेल्याची चर्चा आहे. नागपूरच्या प्रशांत कोरटकरने कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कॉल करुन धमकी दिली होती. त्यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दही वापरले होते. त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या तक्रारीनंतर कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला. पण 25 फेब्रुवारीपासून कोरटकर फरार असून त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा नाही. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा असून त्याला पुष्ठी देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने 19 मार्चला फेटाळला गेला. अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. पण आता तो देश सोडून गेल्याची चर्चा आहे. विरोधकांकडून टीकेचा आसूड कोटरकर प्रकरणी खासदार संजय राऊतांनी नागपूरच्या पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी खासदार राऊतांनी केली. संशयित आरोपीने देश सोडून जाणं गंभीर असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. तर पोलिसांनीच कोरटकरला पळायला मदत केली असेल असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. महाराजांचा अपमान करणारा विकृत माणूस देशातून पळून जातो, कारण फडणवीसांनी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पुरस्कार द्यायचं ठरवलंय अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. प्रशांत कोरटकर दुबईला जावो की कुठेही जावो, पोलीस त्याला शोधून काढतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रशांत कोरटकरचा पासपोस्ट जप्त करा अशी मागणी करत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये अर्ज केला आहे. कोरटकरच्या कथित पलायनाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी हा अर्ज दाखल केला. प्रशांत कोरटकर प्रकरणात एबीपी माझाचे प्रश्न 1. एक महिना होत आला, प्रशांत कोरटकरला धमकी प्रकरणात अटक का नाही? 2. प्रशांत कोरटकर महाराष्ट्र पोलिसांपेक्षाही मोठा आहे का? 3. प्रशांत कोरटकरला अटक होऊ नये यासाठी पोलीसच प्रयत्नशील आहेत का? 4. कोरटकरला अटक न करण्यानं पोलिसांची बदनामी होत नाही का? 5. खरंच,प्रशांत कोरटकरला कुणी पाठीशी घालतंय का? 6. कोरटकरला अटक करु नये असे वरिष्ठांचे पोलिसांना निर्देश आहेत का? 7. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतची मैत्री कोरटकरला फायद्याची ठरतेय का? 8. कोरटकरसारख्या 'चिल्लर'व्यक्तीचा ठावठिकाणा लागू नये एवढे पोलीस निष्क्रिय आहेत का? 10. प्रशांत कोरटकरला कधीच अटक होणार नाही का?

Prashant Koratkar : फरार प्रशांत कोरटकरविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी, कुठे-कुठे प्रवास केला याची माहिती घेणार

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिस नागपूरमध्ये ठाण मांडून असले तरी त्यांना नागपूर पोलिसांकडून सह कार्य केले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. अशात आता प्रश...

Continue reading

विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीकडून दलित वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अंगणवाडीजवळ हातपंप असूनही त्याला जोडलेली बोरवेल मशीन फक्त अंगणवाडीसाठी वापरली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 💧 महिलांना आणि मुलांना तासनतास संघर्ष गावातील महिलांना आणि लहान मुलांना हातपंपाने तासन्‌तास पाणी काढावे लागत असूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे. ➡️ गेल्या तीन-चार वर्षांपासून हा त्रास सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ➡️ दलित वस्तीतील नागरिकांना अद्याप शासनाची घरकुल योजना मिळालेली नाही. ➡️ ग्रामसेवक भदे यांना परिस्थितीची जाण नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 📢 ग्रामस्थांची मागणी – प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला, तसेच अकोट पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. 🔊 सरपंच निलेश नारे यांचे आश्वासन ➡️ "आठवडी बाजार भागातील दलित वस्तीमध्ये लवकरच पाईपलाईन टाकून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर कोणालाही हातपंपावर अवलंबून राहावे लागणार नाही." 👥 नागरिकांचे म्हणणे गोपाल शिरसाठ (नागरिक, आसेगाव बाजार) ➡️ "गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहत असलो तरी ग्रामपंचायतीने अद्याप पिण्याच्या पाण्याची योग्य सोय केलेली नाही. महिलांना आणि मुलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे." ➡️ आता प्रशासन आणि ग्रामपंचायत यावर कितपत तातडीने कारवाई करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीची पाणीपुरवठ्याबाबत उदासीनता; नागरिकांना नाहक त्रास

अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीकडून दलित वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अंगणवाडीजवळ हातपंप असूनही...

Continue reading

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव; वकील संघाची ठाम भूमिका

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव; वकील संघाची ठाम भूमिका

📍 मूर्तिजापूर | प्रतिनिधी राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ मूर्तिजापूरमध्ये शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले. आता कर...

Continue reading

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी!

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी!

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी! IPL 2025 च्या 18 व्या हंगामाला आज (दि.22) सुरुवात होत आहे. आयपीएलच्या...

Continue reading

अजितदादा-पाटील भेटीवर राऊतांचा टोला वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केलाय. संजय राऊत म्हणाले की, त्यांचे उत्तम चाललेले असते. शिवसेनेतून आमचे जे काही लोक सोडून गेले आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या नाही तर आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही त्यांच्या आसपासही जाणार नाही. पण यांचे बरे असते, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट असते, एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, त्यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. आमच्याकडे असे काहीही नाही. त्यामुळे आमच्या काही भेटीगाठी कुणाशी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी देखील आम्ही टाळतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Sharad Pawar: दिलीप वळसेंनी दादांच्या केबिनचं दार उघडलं, शरद पवारांनी कटाक्ष टाकताच अजित पवार…, पाहा व्हिडिओ

Sharad Pawar: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळीची बैठक सकाळी 10 वाजता बोलावण्यात आली होती. ही बैठक अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होती.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

Continue reading

क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस, माझ्या समाजाचा नुसता वापर केलाय : मनोज जरांगे

क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस, माझ्या समाजाचा नुसता वापर केलाय : मनोज जरांगे

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही, आणि ते नकोही, आम्हाला छत्रपतींचा हिंदुत्व मान्य असल्याचे देखील मनोज जरांगेंनी म्हटले आहे. Manoj Jara...

Continue reading

Nagpur Violance : नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी अवस्थेतच असेलल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ईरफान अंसारी असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही दिवसापासून नागपुरातील मेयो रुग्णालयात (Mayo Hospital) ईरफान अन्सारी यांच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी झालेल्या हिंसाचारात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर उपचार दरम्यान मेयो रुग्णालयात इरफान अन्सारीने प्राण सोडले आहे. किंबहुना या घटनेने नागपूर हिंसाचाराचा (Nagpur Violance) पहिला बळी आज अन्सारी ठरल्याचे पुढे आले आहे. नागपुरात गेल्या सोमवारी(17 मार्च) विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर मोठा हिंसाचार भडकला. दोन गटात झालेल्या राड्यानंतर शहरात प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे बघायला मिळाले. यात दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत पोलिसांसह नागरिकही जखमी झाले. दंगलीनंतर या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असतांना या हिंसाचाराची दाहकता ही समोर आली आहे.

नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, मेयो रुग्णालयात इरफान अन्सारीने प्राण सोडला

Nagpur : नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी अवस्थेतच असेलल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माह...

Continue reading

मोबाइल स्टेटसवरून पोलिसांची अमानुष मारहाण; युवक आक्रमक

मोबाइल स्टेटसवरून पोलिसांची अमानुष मारहाण; युवक आक्रमक

उरळ | मोबाइल फोनवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून उरळ पोलिसांनी काही युवकांना अमानुषपणे मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषी पोलिसांवर कारवाईच्या माग...

Continue reading

पुणे: पुणे शहरातील चंदननगर परिसरामध्ये पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून आयटी अभियंत्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीशी भांडण आणि तिच्यावर असलेल्या संशयातून पतीने चाकूने गळा चिरून मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. हिम्मत माधव टिकेटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. काल (शुक्रवारी दि. 21) दुपारी नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला होता, ही धक्कादायक घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आयटी अभियंता असलेला माधव साधुराव टिकेटी (38, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर) असे खून करणाऱ्या नराधम बापाचं नाव असून, त्याला चंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा विशाखापट्टनम येथील राहणारा असून, 2016 पासून तो पुण्यात वास्तव्यास आहे. याबाबत स्वरूपा माधव टिकेटी (वय ३०) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्याचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आहे. माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घ्यायचा अन्... चंदननगर परिसरातमध्ये हे कुटुंब वास्तव्यास आहे. आरोपी माधव आणि त्याची पत्नी स्वरूपा हे उच्चशिक्षित आहेत. त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे आणि साडेतीन वर्षाचा मुलगा होता. माधव हा आयटी कंपनीत कामाला आहे. पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होतं. तसेच तो सतत दारूच्या नशेत असतो. माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता. गुरुवारी सकाळी त्याचे पत्नीशी भांडण झाले. भांडणाच्या आवाजामुळे हिंमत झोपेतून उठला. दुपारी साडेबारा वाजता माधव घरातून बाहेर पडत असताना त्याने मुलीला घेऊन येतो म्हणून घरातून निघाला सोबत मुलाला घेऊन निघाला. त्यामुळे आरोपीने मुलाला दुचाकीवर बसवून सोबत नेले. खराडी परिसरात फिरल्यावर त्याने दारू प्यायली आणि एका दुकानातुन धारदार चाकू खरेदी केला. त्यानंतर खराडी दर्ग्यासमोरील फॉरेस्ट पार्क परिसरात निर्जनस्थळी जाऊन चाकूने मुलाचा गळा चिरून खून केला. त्याने मुलाला तिथेच टाकलं आणि तो सायंकाळी वडगाव शेरीतील एका लॉजमध्ये जाऊन झोपला. रात्रीचे नऊ वाजले त्यानंतर पती आणि मुलगा घरी न आल्याने आईने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचा शोध घेतला. त्याने भरपूर दारू प्यायली होती. मुलाचा ठावठिकाणा सांगता येत नव्हता. शुक्रवारी पुन्हा आरोपीकडे कसून तपास केल्यावर मुलाचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती दिली . असा झाला खुनाचा उलगडा माधवसोबत मुलगा हिम्मत पोलिसांना सापडला नाही. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने आपण दारू पिल्यानंतर सिगारेट ओढत असताना हडपसर येथील बस स्टँडवर तो हरवला असं सांगितलं. पोलिसांना माधवच्या बोलण्यावर संशय होता. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे, स्वाती खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अजय असवले, राहुल कोळपे, पोलिस हवालदार विश्वनाथ गोणे यांच्या पथकाने माधवला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि चौकशी केली, त्यानंतर त्याच्याकडून या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. मुलाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे सांगितले. दुकानातून चाकू, ब्लेड विकत घेतलं तपासादरम्यान पोलिसांना नराधम माधवचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं. त्यामध्ये माधव मुलगा हिम्मत याला घेऊन जाताना दिसत आहे. तसेच, एका दुकानातून त्याने ब्लेड आणि चाकू खरेदी केला. त्यानंतर त्याने गुरुवारी दुपारी अडीच ते पावने तीनच्या सुमारास मुलगा हिम्मतचा चाकूने गळा कापून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच फेकून दिल्यानंतर लॉजवर येऊन झोपला होता.

‘हा मुलगा माझा नाही’, पतीच्या डोक्यावर संशयाचं भूत, तीन वर्षांच्या मुलाला घेऊन गेला त्याला संपवलं अन्…दारू पिऊन लॉजवर गेला

Father kills son: फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्याचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आह...

Continue reading

Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल

Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही…; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल

Nanded Crime : आमच्या मुलीशी का बोलतोस, असे म्हणत नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली होती. यानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. Nanded Crime : आमच्...

Continue reading