तेल्हारा – तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी हवामान बदलामुळे झालेले मोठे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन पीक विमा भरपाई मंजूर करण्याची मागणी केली आहे. स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी दि. १२ जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा यांच्याकडे निवेदन सादर केले, ज्यावर अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनानुसार, या हंगामात अवकाळी पाऊस, तीव्र उष्णता आणि वारा यामुळे तेल्हारा तालुक्यातील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फळधारणा कमी झाल्याने शेतकऱ्यांना गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप १००% केळी पीक विमा मंजूर केलेला नाही, असे निवेदनात नमूद केले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, राज्य सरकारने महाराष्ट्रातील इतर भागांप्रमाणे तेल्हारा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना समावेश करून त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा स्वराज्य पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.
निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी अकोला, विभागीय कृषी सहसंचालक अमरावती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला आणि तहसीलदार तेल्हारा यांना पाठवण्यात आली आहे. शेतकऱ्यांमध्ये भरपाई न मिळाल्याने तीव्र असंतोष आहे.
Related News
शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू; पण उद्योजकांना नको! शिंदेंच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, विरोधकांचा संताप
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री
Continue reading
सरकारचं वाढलं टेन्शन! CJP, शेतकरी, विरोधकांनंतर दिल्लीत आणखी एका आंदोलनाचा इशारा; E20 पेट्रोलविरोधात टॅक्सी व्यावसायिकांचा थेट संसदेवर मार्च
राजधानी दिल्ली सध्या विविध आंदोलनांमुळ...
Continue reading
बनावट सोयाबीन बियाणे प्रकरण : शिवसेना (उबाठा)ची मोठी मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची भरपाईमुर्तिजापूरमध्ये निकृष्ट व बनावट सोयाबी...
Continue reading
संत्रा मृग बहार पीकविमा योजना तातडीने सुरू करा! अकोट तालुक्यात शेतकऱ्यांची तीव्र मागणी, अनिश्चिततेमुळे वाढली चिंता
अकोट तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतक...
Continue reading
सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत मूर्तिजापूरात शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर टाकून...
Continue reading
शेतकरी आंदोलन पेटले! रविकांत तुपकरांच्या आंदोलनादरम्यान संतप्त आंदोलकांकडून एसटी बस जाळली; बुलडाण्यात तणावपूर्ण वातावरण
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्ज...
Continue reading
पंढरपूर : गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे आंदोलन स्थगित; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू क...
Continue reading
Rohit Pawar Hunger Strike: ‘कर्जमाफी फसवीच नाही तर आजारी’; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात, आंदोलनावर ठाम
शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र प...
Continue reading
पंढरपूरातील रोहित पवारांचं आंदोलन ठरलं अपयशी
पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्रित करत अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात ...
Continue reading
कांद्याच्या घसरलेल्या भावांनी हतबल बळीराजा; ‘गांजा लागवडीला परवानगी द्या’ म्हणत सरकारला पत्र
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटातून...
Continue reading
केळी हे तेल्हारा तालुक्याचे प्रमुख फळपीक असून, हवामान आधारित पुनर्रचित पीक विमा योजनेअंतर्गत (RWBCIS) अकोला जिल्ह्यात आंबिया बहारासाठी संरक्षण उपलब्ध आहे. मात्र, उत्पादन आधारित किंवा हवामान ट्रिगर निकषांमुळे भरपाई मिळण्यास अडचणी येत असल्याचे शेतकरी सांगतात. यंदाच्या हंगामात तीव्र उष्णतेमुळे मोठा फटका बसल्याने पीक विमा मंजुरीसाठी मागणी तीव्र झाली आहे.
स्वराज्य पक्षाचे नेते कुलदीप बाजारे, रवी गवळी, अशोक भारसाकडे, शिवाजी खारोडे आणि सुनील गवारगुरु यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचे न्याय मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य पक्षाने दिला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/heartfelt-condolence-and-felicitation-of-borgaon-manju-district-school-headmaster-sahebrao-morde/