कत्तलीसाठी जाणाऱ्या 15 गोवंश जनावरांची सुटका

गोवंश सुटका
गोंदिया : गोपनीय माहितीच्या आधारावर गोरेगाव पोलिसांनी आज, (दि. ९) पहाटेच्या सुमारास केलेल्या नाकाबंदी कारवाईदरम्यान १५ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ११.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एका खासगी वाहनात गोवंशीय जनावरांना निर्दयतेने कोंबून कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची गुप्त माहिती गोरेगावचे ठाणेदार पोलीस  निरीक्षक अजय भुसारी यांना  मिळाली.
दरम्यान, मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे गोरेगाव पोलीस पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी कारवाई केली.
यावेळी अशोक लेलँड बडा दोस्त एमएच ३६ एए ३९३५ क्रमांकाचे वाहन म्हसगाव कडून गोरेगावच्या दिशेने येताना दिसले. दरम्यान, पोलीस पथकाने वाहन थांबविले असता त्यातील दोन इसम पळून गेले.
यावेळी वाहनाची तपासणी केली असता वाहनात प्रत्येकी १० हजार रुपये प्रमाणे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे १५ गोवंशीय जनावरे हे दाटीवाटीने कोंबून भरून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे दिसून आले.
या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात अप क्र.३८८ /२०२४ प्राण्यांचा छळवणूक प्रतिबंधक अधिनियम कलम ११(१)डी,इ,एफ,जे सहकलम महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम ५,६,९ सहकलम ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून जनावरे व १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा ११ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक चव्हाण करित आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांच्या निर्देशान्वये उपविभागिय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अजय भुसारी, पोलीस उपनिरिक्षक सुजित घोलप, आनंद चव्हाण, पोलीस अंमलदार पोलीस शिपाई पवनकुमार वलथरे, शैलेंद्र बोंद्रे, तेजराम हरिणखेडे, रणधीर साखरे यांनी केली.

Related News