कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळावे यासाठी लागू करण्यात आलेल्या POSH (Prevention of Sexual Harassment) कायदा 2013 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत श्रीमती हर्षला गोलवलकर, अॅड. सध्या साबिर्दे, श्रीमती यशोधरा गोडबोले, अॅड. अस्मिता काटे, प्रसन्न धर्माधिकारी आणि अॅड. शैली पंड्या यांच्या टीमने महिला व बाल विकास मंत्री Aditi Tatkare तसेच श्रम मंत्री Akash Fundkar यांची भेट घेत विविध सुधारणा प्रस्ताव सादर केले.

बैठकीदरम्यान POSH कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सध्या वार्षिक स्वरूपात सादर होणाऱ्या अहवालांऐवजी त्रैमासिक किंवा सहामाही अहवाल सादर करण्याची व्यवस्था असावी, जेणेकरून कायद्याच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेता येईल, अशी मागणी करण्यात आली. तसेच SHe-Box हेल्पलाइन आणि 112 या आपत्कालीन क्रमांकाची माहिती प्रत्येक कार्यालयात स्थानिक भाषेत ठळक फलकांवर प्रदर्शित करावी, जेणेकरून महिलांना तातडीने मदत मिळू शकेल, अशी सूचना मांडण्यात आली.
Related News
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : सरकारी कंपन्याही वाढवणार पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : Petrol आणि डिझेलच्या दरांक...
Continue reading
ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा; दिल्लीत INDIA आघाडीचा हल्लाबोल, निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा
INDIA Bloc Protest Against Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञाने...
Continue reading
शेतकऱ्यांना मदत लवकरच? ४४ टक्के पंचनामे पूर्ण; १०-१२ ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के पंचनाम्यांचे कृषिमंत्र्यांचे लक्ष्य
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्...
Continue reading
SIR वरून विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचे सणसणीत उत्तर; अचूक मतदार यादीसाठी महत्त्वाचे 8 मुद्दे समोर
Devendra Fadnavis on SIR : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR 2026...
Continue reading
फडणवीस मोदींचे वारसदार? उपपंतप्रधानपदाबाबत संघात चर्चा असल्याचा संजय राऊतांचा दावा; तीन महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
१० ते १२ महिलांच्या तक्रारींचा दावा; श्वेता महालेंचा सूचक इशारा, संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता अधि...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
No UPI Day Today 2 October : आज बाजारात जाताना खिशात कॅश ठेवा; व्यापाऱ्यांचा ‘नो UPI डे’, अतिरिक्त शुल्काच्या प्रस्तावाला विरोध
No UPI Day Today 2 October : देशभरातील व्यापारी सं...
Continue reading
‘तुम्ही साले… कसले बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार?’; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप ऊर...
Continue reading
याशिवाय, नवीन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू झाल्यानंतर सात दिवसांच्या आत POSH कायद्याचे प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्याचा प्रस्तावही बैठकीत ठेवण्यात आला. कायद्याच्या प्रभावी निरीक्षणासाठी आणि अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र राज्य POSH निरीक्षण प्राधिकरण स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली.
मंत्र्यांनी टीमने मांडलेल्या सर्व मुद्द्यांचे स्वागत करत त्यावर सकारात्मक भूमिका घेतली. लवकरच यासंदर्भात शासकीय ठराव (GR) जारी करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच इतर प्रस्तावित सुधारणा अंमलात आणण्यासाठीही शासन सकारात्मक विचार करणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
शासकीय ठराव प्रसिद्ध झाल्यानंतर POSH कायद्याच्या सुधारित अंमलबजावणीसाठी पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि न्याय मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना बैठकीनंतर व्यक्त करण्यात आली.
read also : https://ajinkyabharat.com/shocking-murder-case-in-yavatmal-lagnala-na-bolavalyachya-ragatoon/