गावालगतच्या शिवाजी नगर शेतशिवारातील गोठ्यावर काल रात्री अचानक झालेल्या
हल्ल्यात तीन बकर्या व दोन वासरांचा मृत्यू झाला. ही घटना विजय रघुनाथ निमकर्डे व रवी रघुनाथ
निमकर्डे यांच्या गुरांच्या गोठ्यात घडली. मृत बकर्यांच्या शरीराचे अवशेष
Related News
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश देत म्हणाले, ‘हर मन में तिरंगा’!
Blinkit च्या गोदामावर FDAचा मोठा दणका; झुरळांचा प्रादुर्भाव, मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळले
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये मोठी चर्चा; राहुल गांधी स्वतः भेटले स्मृती शिंदेंना
TET पेपरफुटीचा धक्कादायक सोलापूर कनेक्शन; 16वा आरोपी अटकेत, पोलीस प्रशिक्षण संस्था चालकावर कारवाई
गडचिरोलीत आश्रमशाळेत मण्यार सापाने 4 विद्यार्थिनींना दंश, 3 मुलींचा दुर्दैवी मृत्यू
पिंपरीत 7 भटक्या कुत्र्यांचा 5 वर्षीय चिमुरडीवर भीषण हल्ला; 46 सेकंद लचके तोडले, शरीरावर 90 टाके
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाहांचा धक्कादायक निर्णय; 1 भेटीने बदलली भारताबाबतची भूमिका?
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत;17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं !JPSC परीक्षा घोटाळ्याला मोठा धक्का!
CGL परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचा जोरदार मोर्चा; पाण्याच्या फवाऱ्यांनाही घाबरले नाहीत,6 अडथळ्यांपैकी 3 पार
पेपर लीकवाल्यांवर एकनाथ शिंदेंचा कडक इशारा! 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटींचा दंड; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही
EPFO Rules: नोकरी गेल्यावर PFचे 75% पैसे लगेच काढता येणार? जाणून घ्या संपूर्ण नियम
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत! केंद्राची खास योजना, कोणाला मिळणार लाभ?
फाडलेले व अर्धवट खाल्लेले दिसून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हल्ल्याची भीषणता:
गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर रात्री हल्ला झाल्याची बाब आज सकाळी निमकर्डे बंधूंना आढळली.
त्यांनी तात्काळ वनविभागाला कळविल्यानंतर वनरक्षक अतिफ हुसेन यांनी घटनास्थळी भेट दिली.
तपासणीनंतर हा हल्ला जंगली जनावरांचा नसून कुत्र्यांचा असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
गावकऱ्यांचा आक्षेप:
मात्र गावकऱ्यांनी व निमकर्डे बंधूंनी या मताला विरोध केला असून, हल्ल्याची तीव्रता व पद्धत पाहता
तो निश्चितच जंगली जनावरांचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी वनविभागाकडे
ऑनलाईन तक्रार दाखल करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
पशुवैद्यकीय तपासणी:
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अबोली कथे यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन केले असून, अहवाल वनविभागाकडे सादर केला जाईल.
सुरक्षा आणि सतर्कता:
ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
वनविभागाने या भागात नजीकच्या काळात गस्त वाढवावी आणि जंगली जनावरांची उपस्थिती
असेल तर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/rajbhrat-coronache-sick/

