शिंदे – फडणवीस – पवारांमध्ये ‘वर्षा’वर एक तास खलबते

विधानसभा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना

वेग येणे सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

Related News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार

यांनी गुरुवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर एक तास चर्चा केली.

चर्चेचा तपशील अधिकृतपणे सांगण्यात आला नसला

तरी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत होता,

असे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी

जागावाटपाचा बराच घोळ महायुतीमध्ये झाला होता,

तसा विधानसभेला होऊ नये यासाठी लगेच जागा वाटपाची

चर्चा सुरू करावी, असे ठरल्याचे समजते.

तिन्ही पक्षांकडून जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू करायला

कोण-कोण नेते असतील, याची नावेही या बैठकीत निश्चित करण्यात आली.

जागावाटपाचे सूत्र लवकर निश्चित झाले नाही तर आपल्या आमदारांची

किवा तगड्या उमेदवारांची पळवापळवी होऊ शकते, अशी शंका महायुतीला आहे.

महाविकास आघाडीतील काही आमदार महायुतीकडून लढू शकतात.

महायुतीचे जागा वाटप लवकर ठरले तर त्यांना ‘शब्द’ देणे सोपे जाईल, असाही विचार पुढे आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/iphone-becomes-cheaper/

Related News