वैष्णवी हगवणेप्रमाणेच तिची जाऊ आणि हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप हगवणे
हिला देखील गंभीर अत्याचारांना सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे.
मयुरीच्या आईने नोव्हेंबर 2024 मध्येच राज्य महिला आयोगाकडे एक तक्रारपत्र दाखल केलं होतं,
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
मात्र त्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, हे आता उघड झालं आहे.
त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तक्रारपत्रात काय म्हटलंय?
मयुरीच्या आईने लिहिलेल्या पत्रात तिच्या मुलीवर सासरच्या लोकांकडून करण्यात
आलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाचा सविस्तर पाढा दिला आहे. त्या पत्रात म्हटलं आहे की,
-
कपडे फाडले गेले,
-
सासऱ्याने छातीवर हात ठेवून असभ्य वर्तन केलं,
-
पैशासाठी सतत मानसिक त्रास दिला,
-
“आमच्याकडे बंदुका आहेत, तुझ्या आईला आणि दिव्यांग भावाला ठार करू,” अशा धमक्या दिल्या,
-
आणि “आमच्या पाठीमागे मोठा राजकीय पाठिंबा आणि पोलीस अधिकारी आहेत” असं म्हणत दहशत निर्माण करण्यात आली.
मयुरीचं सुशील हगवणे याच्यासोबत २० मे २०२२ रोजी विवाह झाला होता.
त्यानंतरपासून तिला दागिने, महागड्या वस्तू आणि पैशांची मागणी करत त्रास दिला जात होता.
सध्या वैष्णवी प्रकरण गाजत असतानाच मयुरीच्या जुन्या तक्रारीनं हगवणे
कुटुंबाविरुद्ध आणखी गंभीर स्वरूपाचे आरोप पुढे येत आहेत.
आता राज्य महिला आयोगाने वेळेवर कारवाई का केली नाही, यावरही जवाब मागितला जाण्याची शक्यता आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/benefits-karoon-dhenar-100-taqs/