अकोला, प्रतिनिधी :
अकोला तालुक्यातील घुसर गावात सावकारी कर्जाच्या ओझ्याला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. राजू श्याम गोपनारायण (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
राजू गोपनारायण यांच्याकडे अवघी ७४ गुंठे शेती असून शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाकरिता तसेच घरगुती गरजांसाठी त्यांनी बँक व खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. पीक अपयश, वाढता उत्पादन खर्च आणि सावकारांकडील कर्जाचा तगादा यामुळे त्यांच्यावर सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज झाले होते. या कर्जबाजारीपणामुळे ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
आज सायंकाळी राजू गोपनारायण घरात दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. शोधादरम्यान ते शेतात विषारी औषध प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. तात्काळ त्यांना उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Related News
शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30 टक्क्यांनी कमी होऊ शकतो; मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना AI आणि तंत्रज्ञानाच्या वापराचा सल्ला
शेती क्षेत्रासमोरील वाढता उत्पादन खर्च, अल्पभूधारक श...
Continue reading
50 वर्षांचं स्वप्न अखेर साकार! पाणी पाहताच भाजप आमदाराच्या डोळ्यात आनंदाश्रू; म्हणाले, ‘वेळप्रसंगी साहेबांसमोर हात जोडून उभा राहीन, पण…’
ग्रामीण महाराष्ट्रात शेती ...
Continue reading
'द इंडिया स्टोरी' चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता श्रेयस तळपदे यांनी अन्नपदार्थांमधील भेसळ, वाढते कॅन्सरचे प्रमाण आणि पुढील पिढीच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. शुद्ध अन्न...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल; 638 ग्रामपंचायतींसाठी ऑक्टोबरमध्ये मतदानाची शक्यता, गावपातळीवरील राजकारणाला वेग
छत्रपती संभाजीनगरात ग्रामपंचायत न...
Continue reading
बीड हादरलं! उचलीच्या वादातून ऊसतोड मजुराचे अपहरण; 4 दिवस अमानुष छळ, तोंडात लघुशंकेचाही गंभीर आरोप
महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या हक्कांचा प्रश्न पुन्हा...
Continue reading
विंचू दंश : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घरात खुंटीवर टांगलेल्या पँटमध्ये लपलेल्या विंचूच्या दंशामुळे अवघ्या 1...
Continue reading
Jalgaon News : पावसात दुचाकी शेतात रुतू नये म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न; आईच्या डोळ्यांदेखत 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्...
Continue reading
El Nino Alert 2026 : भारतासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मॉन्सून यंदा मोठ्या संकटाच्या छायेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या ...
Continue reading
माधुरी दीक्षितचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल; चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा क्रेझ वाढली
बॉलिवूडच्या “धकधक गर्ल” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षित या आजही आपल्या सौंदर्य, अभिनय ...
Continue reading
AC ब्लास्ट वाढती भीती: घराघरात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
उन्हाळ्याच्या तीव्र तापमानात एअर कंडिशनर (AC) हे आज गरजेचे उपकरण बनले आहे. शहरी तसेच निमशहरी भागांमध्ये AC चा वापर झपाट्...
Continue reading
लाखपुरीत धक्कादायक घटना! दोन दुचाक्या जळून खाक; लाखोंचे नुकसान, दोषींवर कारवाईची मागणी
मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी गावात रविवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेम...
Continue reading
इनामगावमध्ये बिबट्याचा थरार! सुनबाईच्या धाडसामुळे सासूबाईंचा जीव वाचला, गावात भीतीचे वातावरण
शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे घडलेली घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विष...
Continue reading
मृत राजू गोपनारायण यांच्या पश्चात आई, भाऊ, अविवाहित मुलगा तुषार (वय २५) आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. विशेष म्हणजे पुढील महिन्याच्या २२ तारखेला मुलगा तुषार याचे लग्न ठरले होते. लग्नाच्या आनंदाच्या उंबरठ्यावर असलेल्या कुटुंबावर अचानक आलेल्या या दुःखद घटनेने गोपनारायण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती अकोट फाईल पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासनाने कर्जमाफी व मदतीसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/honorable-lady-gave-gift-to-console-the-family-of-hidayat-patel-of-mohala/