अकोट (प्रतिनिधी विशाल आग्रे): तालुक्यातील सावरा गावात अरुण शालीग्राम सपकाळ यांच्या
घराला 2 एप्रिलच्या मध्यरात्री अचानक भीषण आग लागली.
रात्री 1 वाजता लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले असून,
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेत एक बैल आणि एक गाईचा होरपळून मृत्यू झाला.
आग लागल्याचे लक्षात येताच अरुण सपकाळ यांनी गावात आरडाओरड करून नागरिकांना जागे केले.
गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती नियंत्रणात आणता आली नाही.
अखेर अकोट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
या आगीत घरातील भांडी, कपडे, धान्य (गहू, ज्वारी, तूर डाळ), दरवाजे,
बांबू आणि कवेलू पूर्णतः जळून खाक झाले. प्रशासनाने घटनेची पाहणी करून पंचनामा केला असून,
एकूण ₹2,75,000 चे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अरुण सपकाळ यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.