महायुतीची भरोशाची विकेट जाणार -संजय राऊत

विधानपरिषदेच्या

विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले.

11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे सर्वच पक्षांनी

मतांची फाटफूट होऊ नये, म्हणून कंबर कसली होती.

Related News

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील

आजारी असतानाही मतदानासाठी आले होते,

तर दुसरीकडे जेलमध्ये असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड

यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय.

त्यामुळे निवडणुकीत काटे की टक्कर होताना दिसत आहे.

दरम्यान, या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले,

क्रिकेटची टीम 11 जणांची असते, मात्र बारावा खेळाडू कधी कधी खेळतो.

तु्म्ही ज्याला बारावा खेळाडू समजत आहात, तो खेळणार आहे.

महायुतीची भरोशाची विकेट जाणार आहे.

आपण वर्ल्डकप जिंकललो आहोत. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार जिंकतील.

सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामिन मंजूर केला,

त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो.

अरविंद केजरीवाल यांना खालच्या कोर्टाने जामीन मंजूर केला होता.

त्याला स्थगिती देण्याचं काहीही कारण नव्हतं.

मोदी-शाहांचा राजकीय दबाव ईडीवर आणि न्यायालयावर असल्यामुळे

स्थगिती मिळाली, पण आता त्यांनी चूक दुरुस्त केलेली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/drinking-tea-in-hotel-is-harmful-for-health/

Related News