रत्नागिरी-नागपूर महामार्ग! चौपट मोबदला दिल्याशिवाय जमिनीची मोजणी नाही, मंत्र्यांना टक्केवारीत जास्त रस, राजू शेट्टी आक्रमक

रत्नागिरी-नागपूर महामार्ग! चौपट मोबदला दिल्याशिवाय जमिनीची मोजणी नाही, मंत्र्यांना टक्केवारीत जास्त रस, राजू शेट्टी आक्रमक

राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय

घेण्यास वेळ नसल्याची टीका स्वाभिमानी

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti )

Related News

यांनी केली. Raju Shetti : राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या

टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय घेण्यास त्यांना वेळ नसल्याची टीका स्वाभिमानी

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी केली आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्गात

चौपट मोबदला दिल्याशिवाय शेतकऱ्यांनी मोजणी करु न देण्याचा निर्णय घेतल्याचे शेट्टी म्हणाले.

चौपट मोबदला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे एक वर्षापासून प्रलंबित आहे.

महामार्गाला चौपट मोबदला दिल्याशिवाय मोजणीस विरोध केल्यावर जबरदस्तीने

भुसंपादनास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांन हातकंणगले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

गेल्या वर्षभरापासून शेतकरी व राज्य सरकार विरोधात हा संघर्ष सुरू असून पोलिस बळाचा वापर

करून बळजबरीने रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शेतकऱ्यांना कोणत्याही नोटीसा न देता हुकुमशाही पध्दतीने

भुसंपादन केले जात आहे. राजू शेट्टी यांनी थेट हातकंणगले पोलिस

ठाण्यात शेतकऱ्यांची भेट घेऊन मोजणी थांबविण्यास सांगितले.

शेतकऱ्यांच्या विरोधात बळजबरीचा वापर केल्यास राजू शेट्टी

यांच्या नेतृत्वाखाली सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत बंद करणार

असल्याचे शेट्टी म्हणाले. राज्य सरकार वेळ काढूपणा करून शेतक-

यांच्या जमीनी कवडीमोल दराने काढून घेण्याचा घाट करत

असल्याचे शेट्टी म्हणाले.

Read more news here :https://ajinkyabharat.com/sanjay-raut-home-minister-mhanje-divyach-aht-yogesh-kadhanchaya-tya-vasavyavarun-sanjay-raut-bhadkle/

Related News