अकोट, दि. : आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
मोहरम सण शांतता, सौहार्द आणि बंधुत्वाच्या वातावरणात पार पडावा, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. रूट मार्चदरम्यान प्रमुख मार्ग, संवेदनशील भाग तसेच धार्मिक स्थळांच्या परिसराची सखोल पाहणी करण्यात आली.
या वेळी पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद बाब दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे सांगितले. उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
Related News
Manoj Jarange Patilची रुग्णालयातून मोठी घोषणा; ‘आता पाटोद्यापासून पुढे मुंबईत आंदोलन’
शेतात मेटल डिटेक्टर लावल्यावरून Rohit Pawar आक्रमक; मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा
Manoj Jarange Patil यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी; आयकर विभागाच्या रडारवर कोण?
‘कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही?’ रोहित पवारांचा सरकारला सवाल
‘Hanuman Ansh’ची टीम थेट ‘वर्षा’वर; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले कौतुक, आगामी प्रकल्पांसाठी दिल्या शुभेच्छा
दुष्काळात काजू-बादामावर ताव; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फडणवीस म्हणाले, “अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत”
FDAच्या गुणवत्ता चाचणीत पॅरासिटामोल फेल; तब्बल 1.25 लाख गोळ्या माघारी
UPI शुल्काविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार; दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात
Tukaram Mundhe ची भूमिका साकारण्यास निलेश साबळेंचा स्पष्ट नकार; म्हणाले, ‘आदरयुक्त भीती आहे’
एकनाथ शिंदेंचा मोबाइल विमानातच विसरला; पोलिसांची मध्यरात्री एकच धावपळ!
ChatGPT चे 5 भन्नाट फीचर्स; मुलांचा अभ्यास होणार स्मार्ट, पालकांचं टेन्शनही कमी!
शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान आयोगाच्या भूमिकेवर मोठा प्रश्न
मोहरम उत्सव सर्व धर्मीय नागरिकांनी शांतता आणि उत्साहात साजरा करावा, तसेच प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन अकोट ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.
