“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…

"पूर्णपणे बिनबुडाचे आरोप" — राहुल गांधींच्या 'मॅच फिक्सिंग' दाव्यावर...

नवी दिल्ली |

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.

यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगाच्या सूत्रांनी म्हटले आहे की, हे आरोप निराधार असून कायद्याचा अवमान करणारे आहेत.

Related News

सूत्रांनी सांगितले की, मतदार याद्यांबाबत चुकीची माहिती पसरवणे, निवडणूक प्रक्रियेत सहभागी हजारो कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा अवमान करणारे आहे.

राहुल गांधी यांनी दावा केला होता की “महाराष्ट्र निवडणूक म्हणजे लोकशाहीतील गडबडीतला ब्लूप्रिंट” होता

आणि हीच “मॅच फिक्सिंग” बिहार आणि इतर भाजपला हारण्याची शक्यता असलेल्या राज्यांत केली जाणार आहे.

ते म्हणाले की “फिक्स” केलेल्या निवडणुका लोकशाहीसाठी विषासारख्या आहेत.

यावर निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, अपयश आल्यानंतर आयोगाच्या

कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे अतिशय बिनबुडाचे काम आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bulfle/

Related News