मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे पुण्यात इमर्जन्सी लॅडिंग

मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात

आलं आहे. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर

पुण्यातील लांडेवाडी परिसरात उतरवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे

Related News

भिमाशंकरमध्ये दर्शनसाठी जात होते. मात्र या खराब हवामानाचा फटका

एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याला बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सहकुटुंब दर्शनासाठी जाणार आहेत. आज श्रावण

महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने एकनाथ शिंदे हे श्रीक्षेत्र भीमाशंकर

येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत. मात्र भीमाशंकर इथे

खराब हवामान आहे. यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर

पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीत उतरवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये धुके

पाहायला मिळत आहे. याच खराब हवामानाचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही

बसला आहे. भीमाशंकरला खराब हवामान असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर

लांडेवाडीत उतरवण्यात आले आहे. शासकीय प्रोटोकॉलनुसार, एकनाथ शिंदे यांचे

हेलिकॉप्टर भीमाशंकर या ठिकाणी उतरवण्यात येणार होते. मात्र भिमाशंकरमध्ये

धुकं, पाऊस असे खराब हवामान आहे. या हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यांचे हेलिकॉप्टर आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी उतरविण्यात आले

Read also: https://ajinkyabharat.com/2-year-old-girl-dies-due-to-collapse-of-timber-wall-in-mathura/

Related News