Pune Crime: पुणे हादरलं! 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; एकटीच शाळेत जात असताना…

Pune Crime: पुणे हादरलं! 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; एकटीच शाळेत जात असताना...

Pune Crime News: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामधील एसटी बसमध्ये बलात्काराचा प्रकार समोर

आल्याच्या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच वाघोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पुण्यातील वाघोली येथे नऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली आहे.

Related News

या प्रकरणी पिठाच्या गिरणीत काम करणाऱ्या एका 27 वर्षीय कामगाराला ताब्यात घेण्यात आलं आहे.

सोमवारी सकाळी ही चिमुकली शाळेत जात असतानाच आरोपीची

तिच्यावर नजर पडल्यानंतर त्याने या चिमुकलीला एकांकात नेऊन दुष्कर्म केलं.

पुण्यात नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ही चौथीत शिकणारी मुलगी शाळेत निघाली असताना

आरोपींना तिला थांबून चॉकलेट तसेच खाऊच आमीष दाखवलं.

त्यानंतर त्यानंतर तिला आडोशाला घेऊन गेला. बाहेर आल्यानंतर मुलगी रस्त्यावर रडत उभी होती.

आसपासच्या नागरिकांनी तिला पाहिलं आणि विचारपूस केली. तेव्हा तिनं तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत बायफ रोडवर ही घटना घडली.

स्थानिक नागरिकांनी 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावून घेतलं.

त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

 

Related News