मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

देवेंद्र फडणवीस

हिवरखेड (ता. अकोट) : अकोट, तेल्हारा आणि हिवरखेड नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी हिवरखेड येथील देशमुख नगर बसस्टॅण्ड परिसरात भव्य जाहीर सभेत नागरिकांना संबोधित केले. मोठ्या प्रमाणावर उत्साहात झालेल्या या सभेला पहिल्यांदाच मुख्यमंत्री उपस्थित राहिल्याने परिसरात प्रचंड उत्सुकता होती.

सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, “मी कोणावरही टीका करण्यासाठी आलेलो नाही. आमच्याकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे. शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद भाजपामध्ये आहे. प्रत्येक गरिबाला जमिनीचा मालकीहक्क मिळाला पाहिजे, नागरिकांचे जीवनमान बदलणे ही आमची प्राथमिकता आहे.”

तसेच मोदी सरकारच्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी आवाहन केले की, “मोदीजींनी राम मंदिरावर धर्मध्वज फडकवला; त्याचप्रमाणे आपण तिन्ही नगरपालिकांवर भगवा फडकवायचा आहे.”

Related News

लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.” यावर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.

सभेला आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, अॅड. आकाश फुंडकर (पालकमंत्री), अकोट विधानसभेचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांचा पक्षाच्या वतीने परिचय करून देत सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय अग्रवाल, संतोष शिवरकर, डॉ. अमित कावरे, माधव मानकर, डॉ. संजय शर्मा, रमेश दुतोंडे, किरण सेदाणी, उमेश पवार, राजेश रावणकर, हरीश टावरी, गोपाल मोहोळ, मंगेश दुतोंडे, गणेश रोठे, संदीप उगले, संदीप पालीवाल, बाळासाहेब नेरकर, सुदाम राऊत आदी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

हजारोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेने भाजपाच्या ताकदीचे दणदणीत प्रदर्शन घडवून आणले.

read also : https://ajinkyabharat.com/home-voting-facility-is-not-available-in-municipal-council-elections/

Related News