बाळापूर (प्रतिनिधी): पारस (ता. बाळापूर) येथील स्वस्त धान्य दुकानातील तांदळाचे कट्टे भरलेली एक विना
नंबर प्लेट पिकअप वाहन शेगावकडे जात असल्याची गोपनीय माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून सदर वाहन पकडले आणि पिकअपसह
Related News
पोस्ट ऑफिसची NSC योजना: 5 वर्षांत सुरक्षित परतावा, 7.7% व्याजासह गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
पोस्ट ऑफिसची NSC योजना : आजच्या वाढत्या महा...
Continue reading
Arjun Tendulkarवर लागणार बोली! मुंबई टी20 लीग लिलावात 5 लाखांची बेस प्राईस
आयपीएलमध्ये संधी न मिळालेल्या अर्जुनसाठी नवी संधी
भारतीय क्रिकेटमधील दिग्गज नाव असलेल्या तेंडुलकर कुटुं...
Continue reading
Mango Tips : आंबे खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का? चुकीच्या सवयींमुळे होऊ शकतात आरोग्याचे त्रास
उन्हाळा आणि आंब्यांचा गोडवा
Mango Tips : उन्हा...
Continue reading
May Bank Holiday 2026 : मे महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद; आधीच करा नियोजन
मे महिना सुरू होण्याआधीच महत्त्वाची माहिती
एप्रिल महिना संपत आला असून अवघ्या काही दिवसांत मे महिन्याची...
Continue reading
Assam Exit Poll 2026 : आसाममध्ये पुन्हा भाजपाची सत्ता? एक्झिट पोलचे संकेत काय सांगतात?
देशभरात निवडणुकीची उत्सुकता शिगेला
Assam Exit Poll ...
Continue reading
अकोल्यात भोंदूबाबाचा अंधश्रद्धेचा काळा बाजार उघड; पोही गावात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील पोही गावातून अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या एक...
Continue reading
PBKS vs RR : राजस्थानचा जबरदस्त हल्लाबोल, पंजाबचा विजयरथ खंडित; 6 विकेट्सने शानदार विजय
IPL 2026 मध्ये पुन्हा एकदा थरारक सामना पाहायला मिळाला, जिथे R...
Continue reading
मोठी बातमी! बड्या मंत्र्याने घेतली जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणावर महत्त्वाची चर्चा
महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठी ...
Continue reading
तांदळाचे कट्टे बाळापूर पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून,
पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.
या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असले तरी या प्रकरणामुळे पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वीही बाळापूर पोलिसांनी अशाच प्रकारे धान्य वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडल्या होत्या.
मात्र, त्या वेळी जिल्हा व तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी विशेष प्रमाणपत्र काढून त्या व्यक्तींना ‘क्लीन चीट’ दिली होती.
यामुळे स्वस्त धान्य दुकानांमधील रेशन माफियांना प्रशासनाचा फारसा वचक राहिलेला नाही, हे स्पष्ट होत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, पकडलेली तांदळाची गाडी कोणत्या दुकानातून,
कोणाकडून आणि कोणत्या आधारे खरेदी झाली? यासंदर्भातील बिले, परवानग्या,
तसेच खरेदी-विक्री केंद्र अथवा तहसील कार्यालयाची मंजुरी आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
सध्या संपूर्ण बाळापूर तालुक्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून, पुरवठा विभाग शासन नियमानुसार कठोर
कारवाई करतो की पुन्हा एकदा संबंधितांना क्लीन चीट देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/punha-collected-yenar-kaka-putane-sharad-pavrani-bjp-palladi-away-yutiisathi-ajit-pawarhi/