नवी दिल्ली | 8 मे 2025 — जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने राबवलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्र सरकारने गुरुवारी सर्वदलीय बैठक बोलावली आहे.
या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, बैठकीत गृहमंत्री अमित शहा,
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर प्रमुख पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत.
बैठकीदरम्यान कर्नल सोफिया कुरैशी यांनी सेटेलाइट प्रतिमा आणि व्हिडीओ सादर करत
ऑपरेशन सिंदूरच्या तपशीलवार माहितीचे सादरीकरण केले. पाकिस्तान आणि पीओकेमधील
कोणते-कोणते दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
भारतीय लष्कर आणि वायुदलाने लश्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मद या संघटनांच्या मुख्यालयांवर मिसाइल हल्ले
करून त्यांचा पूर्णपणे नाश केला. हे ठिकाण हाफिज सईद आणि मसूद अजहरसारख्या कुख्यात दहशतवाद्यांचे गड मानले जात होते.
सरकारने या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांची अधिकृत आकडेवारी दिली नसली,
तरी मीडिया अहवालानुसार 70 पेक्षा अधिक अतिरेकी ठार झाल्याचे समोर आले आहे.
या बैठकीत सरकारकडून सीमेवरील परिस्थिती, पुढील लष्करी धोरणं, आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया,
आणि देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा करण्यात येत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी
सुरक्षादलांच्या धाडसी कारवाईचे समर्थन करत सरकारला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-sonyachaya-darat-usi/