भारतातील कोट्यवधी आधारधारकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI ने जुने ‘mAadhaar’ ॲप लवकरच बंद करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता युजर्सना नवीन आणि अधिक सुरक्षित ‘Aadhaar App’ वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे नवीन ॲप अधिक स्मार्ट, जलद आणि अत्याधुनिक सुरक्षा फीचर्ससह लॉन्च करण्यात आले असून ते Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध आहे.
डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन ओळख पडताळणी वाढत असताना आधार डेटा सुरक्षित ठेवणे ही मोठी गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर UIDAI ने नवीन Aadhaar App विकसित केले आहे. या ॲपमध्ये QR आधारित आधार शेअरिंग, फेस ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक लॉक कंट्रोल आणि निवडक माहिती शेअरिंग यांसारखी प्रगत सुविधा देण्यात आल्या आहेत.
mAadhaar ॲप का बंद होत आहे?
UIDAI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर अधिकृत पोस्ट करत mAadhaar ॲप बंद करण्याची माहिती दिली. जुन्या ॲपमध्ये मर्यादित फीचर्स आणि तांत्रिक अडचणी असल्याने नवीन पिढीच्या डिजिटल सुरक्षेच्या गरजा पूर्ण करणे कठीण होत होते. त्यामुळे अधिक सुरक्षित आणि वेगवान अनुभव देण्यासाठी नवीन Aadhaar App सादर करण्यात आले आहे.
Related News
घड्याळासारखा पट्टा, पण स्क्रीनच नाही! Zebronicsचे नवे स्मार्ट बँड; Heart Rate, SpO2, Sleepसह 100 हून अधिक Sports Modes
Zebronics : स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकरच्या बाजारात सातत्या...
Continue reading
H-1B व्हिसाबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी चिंता वाढली, $1 लाख शुल्काचा नियम कायम
अमेरिकेतील H-1B व्हिसावर काम करणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प प्रशासना...
Continue reading
UPI शुल्काच्या विरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार; QR कोड हटवण्यास सुरुवात, सरकारला आंदोलनाचा इशारा
UPI MDR Charges : डिजिटल व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या UPI प्रणाली...
Continue reading
ChatGPT चे 5 भन्नाट फीचर्स; विद्यार्थ्यांच्या अभ्यासात AI ची नवी मदत, पालकांनाही मिळणार नियंत्रण
ChatGPT : विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI चा वापर झपाट...
Continue reading
Flipkart Big Billion Days 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार मोठा सेल; फोन, लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या ऑफर्सची शक्यता
Flipkart Big Billion Days 2026: ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्र...
Continue reading
UPI व्यवहारांवर आता शुल्क? 15 ऑक्टोबरपासून काय बदलणार, ग्राहकांवर किती परिणाम होणार? A टू Z जाणून घ्या
UPI MDR Decision : भारतात डिजिटल पेमेंटचा सर्वाधिक वापर होणाऱ्या UPI व्यवस्थ...
Continue reading
UPI च्या मोठ्या व्यवहारांवर चार्ज लागणार? पैसे पाठवताना शुल्क कसे टाळाल? जाणून घ्या संपूर्ण नियम
UPI : डिजिटल पेमेंटचा वापर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चहाच्या...
Continue reading
UPI व्यवहारांवर शुल्क? 2 हजारांपेक्षा जास्त व्यवहाराबाबत केंद्राचा मोठा निर्णय; दुकानदारांवर होणार परिणाम
UPI आता पूर्णपणे मोफत राहणार नाही? 2 हजारांवरील व्यवहारांबाबत केंद्राचा म...
Continue reading
Flipkart Big Billion Days 2026: ऑक्टोबरमध्ये सेल सुरू होण्याची शक्यता; iPhone 17 वर मोठ्या डिस्काउंटची अपेक्षा
Flipkart Big Billion Days Sale 2026: ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकां...
Continue reading
QR कोड स्कॅनची गरज नाही! UPI चे ‘Tap & Pay’ फीचर कसे काम करणार? Google Pay-PhonePe वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट
UPI New Tap And Pay Feature : QR कोड स्कॅन करण्याची गरज नाही! भा...
Continue reading
iPhone Duo लॉन्च होताच Apple ला मोठा धक्का; एका दिवसात 9.5 लाख कोटींचे नुकसान
Apple iPhone Duo Launch: ॲपलने अखेर आपला बहुप्रतीक्षित पहिला फोल्डेबल स्मार्टफोन iPhone Duo बाजारात स...
Continue reading
EPFO Enrolment Campaign 2026 : नोकरीला 17 वर्षे पूर्ण झाली? मग ही संधी सोडू नका; PF सोबत पेन्शन आणि विम्याचाही लाभ
EPFO Enrolment Campaign 2026 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघट...
Continue reading
विशेष म्हणजे, हे नवीन ॲप 13 भारतीय भाषांना सपोर्ट करते. त्यामुळे देशातील विविध भागातील नागरिकांना त्याचा वापर सहज करता येणार आहे.
नवीन Aadhaar App मध्ये काय खास?
नवीन Aadhaar App मध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे QR आधारित आधार शेअरिंग. यामुळे युजरला त्यांचा संपूर्ण आधार नंबर न देता आवश्यक ती माहितीच शेअर करता येणार आहे.
उदाहरणार्थ, एखाद्या हॉटेलमध्ये किंवा कार्यालयात ओळख पडताळणी करताना पूर्ण आधार नंबर देण्याची गरज भासणार नाही. फक्त QR कोड स्कॅन करून आवश्यक माहिती समोरच्या व्यक्तीला दिसेल. त्यामुळे डेटा चोरी किंवा गैरवापराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
फेस ऑथेंटिकेशनमुळे सुरक्षा अधिक