“ओबीसी महासंघाचा उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन”

"ओबीसी महासंघाचा उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन"

कळंबी महागाव 

ओबीसी महासंघाच्या वतीने 21 फेब्रुवारी 2025 रोजी अकोला उपजिल्हाधिकारी

कार्यालयात विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

Related News

यावेळी, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मागास बहुजन कल्याण

मंत्री यांच्या उपस्थितीत 29 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीतील काही

मागण्या अजूनही प्रलंबित आहेत, असे निवेदन देणाऱ्यांनी सांगितले.

ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या बेमुदत उपोषणाच्या सोडवणीसाठी मुख्यमंत्री

आणि उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते, तरी काही मागण्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही.

निवेदन देणाऱ्यांमध्ये प्राध्यापक नरेंद्र लखाडे (जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ),

सुमनताई भालधाने (महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष), शोभाताई शेळके (ग्रामीण महिला आघाडी),

राजेश गावंडे, अभिजीत कौशल, उषाताई पोहनकर, अंजलीताई गिरे,

सुधाकरराव भाकरे, अश्विन खडसे, रामराव पाटेखेडे, अनंत फाटे आणि

गजानन ढाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Read more news here : https://ajinkyabharat.com/the-question-of-sanjay-raut-bhatkya-atmachaya-shejari-pmone-modis-settlement/

Related News