Exclusive
विठ्ठल महल्ले
अकोला — शहरातील वखरे लेआउट परिसरात अज्ञात चोरट्याने चक्क न्यायाधीशाच्या घरातच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची घटना रविवारी उघडकीस आली.सदर घटनेबाबत सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३६३/२०२५, कलम ३३(४), ३०५ भा.दं.सं. नुसार दाखल करण्यात आला.
अकोल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले मात्र दिवाळीच्या सुट्टीमुळे त्यांच्या मूळ गावी परतवाडा येथे गेले होते. दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास शेजारी रुपेश झाडे यांनी फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. न्यायाधीश महोदयांनी घरी येऊन पाहणी केली असता, बेडरूममधील दोन्ही कपाटे उघडी पडलेली दिसली आणि घरातील कपडे तसेच इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे त्यांनी लक्षात घेतले.
चोरी गेलेल्या मुद्देमालात ३.५ ग्रॅम सोन्याची अंगठी (किंमत ५,००० रुपये), १.५ ग्रॅम सोन्याची लहान अंगठी (किंमत ३,००० रुपये), चांदीचे २० ग्रॅमचे लॉकेट (किंमत २,००० रुपये), ३० ग्रॅमची चांदीची चैन (किंमत ५,००० रुपये) आणि प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवलेले रोख २२ हजार ५०० रुपये असा एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
सदर घटना रात्री एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंतच्या वेळेत घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल होऊन पंचनामा केला असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपीचा मागोवा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Related News
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; तिघांना क्लिनचिट, चार्जशीटमधून नेमकं काय समोर आलं?
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आल...
Continue reading
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
Continue reading
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्...
Continue reading
मुंबई कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मरीन ड्राईव्हहून हाजीअलीच्या दिशेने जाणाऱ्या भरधा...
Continue reading
लोकप्रतिनिधींचा काजू-बादामावर ताव; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, प्रशासनाला सुनावले
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू असताना काजू-बादाम खातानाचा व्हिडीओ ...
Continue reading
8 महिन्यांची चिमुकली मध्यरात्री अंथरुणातून बेपत्ता; नाशिकमध्ये खळबळ, अपहरणाचा गुन्हा दाखल
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसो...
Continue reading
दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या; शेतात फेकला मृतदेह, 50 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींना पकडले
Delhi Crime News : राजधानी दिल्लीत अल्पवयीन मुलीवर सा...
Continue reading
फडणवीसांचा ठाकरेंना टोला; ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनावरून म्हणाले, “हे नाकार्त्यांचं आंदोलन”
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसे...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/nanded-diwali-went-still-no-help-1-unhappy-farmer-vandalized-tehsildars-vehicle/