नांदेड : दिवाळी गेली तरीही मदत नाही… संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या गाडीची केली तोडफोड!
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आनंद देऊळगावकर या तहसीलदारांच्या गाडीची साईनाथ खानसोळे या शेतकऱ्याने फावड्याने तोडफोड केली. “जय जवान जय किसान” असा घोष देत संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या कारच्या काचा फोडल्या.
नांदेडचा शेतकरी संतप्त !
शेतकरी साईनाथ खानसोळे यांनी आरोप केला की, अनुदानाचे पैसे न मिळाल्याने दिवाळी साजरी करता आली नाही, तसेच अधिकारी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांच्या बांधावर येत नाहीत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
Related News
तुकाराम मुंढे यांचा नोकरशाहीला आरसा; अधिकाऱ्यांची जबाबदारी स्पष्ट, म्हणाले ‘जर मी नाही, तर कोण?’
IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे आपल्या...
Continue reading
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिला अपात्र, आता फक्त इतक्यांनाच मिळणार लाभ
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच...
Continue reading
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी
IPS रूपा मौदगिल : महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प...
Continue reading
मराठवाडा-विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना! खासदार अनुप धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे 10 महत्त्वपूर्ण मागणी
अकोला/नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2026 : मराठवाडा आणि विदर्भातील रेल्व...
Continue reading
महिलांना 50 हजारांची आर्थिक मदत? योगी सरकारच्या ‘मास्टरप्लॅन’ची जोरदार चर्चाउत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 जवळ येत असताना राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
मोठी आनंदवार्ता! PF थेट UPI ने काढता येणार; कामगार मंत्रालयाने सांगितली तारीख, EPFO सदस्यांना मोठा दिलासा
UPI PF Withdrawal : देशभरातील कोट्...
Continue reading
EPFO E-PRAAPTI Portal : विसरभोळ्या कर्मचाऱ्यांसाठी EPFO चे ‘ब्रह्मास्त्र’; आता जुन्या PF खात्यातील अडकलेले पैसे मिळवणे होणार सोपे
EPFO E-PRAAPTI Portal : निष्क्रिय PF खात्यांमधील ...
Continue reading
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 1000 मुलींना ‘सुकन्या समृद्धी’चे धनादेश; दरवर्षी 20 हजार रुपये, 10 वर्षे सरकार करणार जमा
मुलींच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ...
Continue reading
घटनेनंतर तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, खानसोळे यांना दिवाळीपूर्वीच ₹6,290 अनुदानाचे पैसे जमा झाले होते. त्यांच्या नावावर गट क्रमांक 371 आणि 382 अशी जमीन असून ती एक हेक्टरपेक्षा कमी आहे.
तहसीलदारांनी सांगितले की, मुदखेड तालुक्यातील सुमारे 85 टक्के शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मिळाले आहेत. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, तहसीलदारांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, आक्रमक होण्याऐवजी प्रशासनाशी संवाद साधावा आणि शांततेने प्रश्न मांडावेत.
read also: https://ajinkyabharat.com/know-5-scientific-and-religious-reasons-why-it-is-edible-wearing-boots-and-slippers/