नीलम गोऱ्हे यांचे अजित पवार गटाबाबत सूचक विधान

राज्याचे

राज्याचे राजकारण दर तीन दिवसांनी बदलत आहे. आमचेही

सर्व लोक निवडणुका लढण्यासाठी तयार आहेत. भाजपाची

आमची युती खूप जुनी आहे. पण पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूजसाठी

Related News

अलर्ट राहावं. कधीही ब्रेकिंग न्यूज येऊ शकते, असे सूचक विधान

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली बंड केल्यानंतर

शिवसेनेतील अनेक नेते त्यांच्याबरोबर आले. विधानपरिषदेच्या

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह याही काही काळाने शिंदे गटात

सामील झाल्या होत्या. तसेच शिंदेंबरोबर कायम राहिलेले बच्चू कडू

हे आता त्यांची साथ सोडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची

आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी

प्रत्येक पक्ष आपापले मतदारसंघ आणि उमेदवार निश्चिती करत आहे.

उमेदवारही या पक्षातून त्या पक्षात जाण्याची तयारी करत असताना डॉ.

नीलम गोऱ्ह यांनी केलेले एक विधान सध्या चर्चे त आहे. “पत्रकारांनी अलर्ट

राहावे, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल”, असे सूचक विधान त्यांनी केले

आहे. सोलापूर दौऱ्यावर आल्या असताना गोहे म्हणाल्या की, राज्याचे

राजकारण दर तीन दिवसांनी बदलत आहे. आमचेही सर्व लोक निवडणुका

लढण्यासाठी तयार आहेत. भाजपाची आमची युती खूप जुनी आहे. पण

पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूजसाठी अलर्ट राहावं. कधीही ब्रेकिंग न्यूज येऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविणार का?

असा प्रश्न यावेळी गोहे यांना विचारण्यात आला. पण त्यांनी हसून यावर

उत्तर देणे टाळले. त्या म्हणाल्या, “मी असा कोणताही दावा केलेला नाही.

माझ्या तोंडी हे शब्द घालू नका. पण राजकारण बदलत आहे. काही जण

अचानक निवडणुकीला उभं राहणार नसल्याचं सांगतात. मग सांगतात

मुलाला उभं करणार. मुलगा काहीतरी वेगळं बोलतो. असेही त्या यावेळी म्हणाल्या.

Read also: https://ajinkyabharat.com/mahur-darshanahoon-parattana-bhavikanchya-vehicle-accident/

Related News