दाना चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये धडकणार
आहे. याबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय
हवामानशास्त्र विभाग IMD ने इशारा दिलाय की, चक्रीवादळ
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
दाना गुरुवार, 24 ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवर धडकणार आहे.
या चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दिसून
येणार आहे. चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या
अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
भारतीय हवामान खात्याने सांगितले की, दाना नावाचे चक्रीवादळ
ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकेल आणि 24 ऑक्टोबरपर्यंत
किनारपट्टीवर पोहोचेल. IMD ने ओडिशा आणि पश्चिम बंगाल
तसेच देशातील इतर अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी
केला आहे. दाना चक्रीवादळामुळे पुरी, भद्रक, केंद्रपारा,
जगतसिंगपूर आणि कटकमध्ये 100 ते 110 किमी प्रति तास
वाऱ्याचा वेग येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने बुधवारी
पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर, दक्षिण 24
परगना आणि उत्तर 24 परगणा या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार
पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पारादीप आणि हल्दिया बंदरांना
सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ओडिशातील भद्रक, बालासोर, जाजपूर, केंद्रपारा, कटक,
जगतसिंगपूर, रायगडा, गजपती, गंजम, कंधमाल, नयागड,
रितिकसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याच वेळी
हवामान खात्याने असेही म्हटले आहे की कोलकाता, हावडा,
हुगली, उत्तर 24 परगणा, पुरुलिया आणि बांकुरा जिल्ह्यात 23,
24 आणि 25 ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता
आहे.